शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

सेलडोह ते चंद्रपूर व गवसी ते गोंदिया पर्यंत होईल समृद्धी महामार्गाचा विस्तार

By कमलेश वानखेडे | Updated: May 14, 2024 18:46 IST

Nagpur : तीन एक्स्प्रेसवे-नागपूर ते चंद्रपूर, नागपूर ते गोंदिया व भंडारा ते गडचिरोली पर्यंत होतील तयार

नागपूर : बाळासाहेब ठाकरे नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचा चंद्रपूर व गोंदिया पर्यंत विस्तार करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. तीन एक्स्प्रेसवे-नागपूर ते चंद्रपूर, नागपूर ते गोंदिया व भंडारा ते गडचिरोली पर्यंत तयार होतील. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानुसार (एमएसआरडीसी) वर्धा जिल्ह्यातील सेलडोह येथून चंद्रपूरसाठी मार्ग तयार होईल.

गोंदियासाठी नागपूरच्या गवसी येथून मार्ग तयार केला जाईल. विस्तारानंतर चंद्रपूर, गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यातील नागरिक थेट मुंबईत पोहचू शकतील. ११ पॅकेजमध्ये तीन महामार्गांचे काम केले जाईल. हे नवे महामार्ग कुठून तयार होतील याची उत्सुकता आहे.एमएसआरडीसीनुसार वर्धा जिल्ह्यातील सेलू तहसीलच्या सेलडोह येथे समृद्धी महामार्गाच्या इंटरचेंज पासून चंद्रपूरसाठी तयार होणाऱ्या नव्या महामार्गाला जोडला जाईल.

नागपूरहून या महामार्गावर येण्यासाठी शिवमडका येथून एन्ट्री करावी लागेल. सेलडोह येथे नव्या मार्गावर जावे लागेल. नागपूर ते चंद्रपूर १९५ किलोमीटर, नागपूर ते गोंदिया १६२ किमी व भंडारा ते गडचिरोली दरम्यान १४२ किलोमीटर चा महामार्ग तयार होईल.

चंद्रपूर मार्ग : १७२ रुपये खर्च करून तयार होणारा हा महामार्ग १९५ किलोमीटर लाबीचा असेल. नागपूर-मुंबई च्या सेलडोह इंटरचेंजवरून हा महामार्ग समुद्रपूरच्या लोनहर, वरोराच्या बोरगांव देशमुख, भद्रावतीच्या चारगांव, कोरपनाच्या नांदगांव व बल्लारपूरच्या जोगापूर मार्गे गोंडपिपरी पर्यंत पोहचेल. घुग्घुस इंटरचेंज येथून चंद्रपूर पोहोच मार्ग ११.९६ किलोमीटर चा असेल. एकूण ६ पॅकेजमध्ये या महामार्गाचे बांधकाम होईल.

गोंदिया मार्ग : गोंदियापर्यंत समृद्धि महामार्गाला चार पॅकेजमध्ये तयार केला जाईल. नागपूरच्या गवसी येथून हा मार्ग २९ किलोमीटर दूर कुहीच्या चनोडा पर्यंत जाईल. तेथून भंडारा जिल्ह्यातील थाना, मनोरा, तिरोडाच्या सोनेगांव, पालडोंगरी, काचेवनी मार्गे सवारी, गोंदिया बायपास, लोहारी मार्गे गोंदियाच्या कारंजा पर्यंत पोहोचेल.

निवडणुकीनंतर कामाला सुरुवात - एमएसआरडीसीच्या सुत्रानुसार समृद्धि महामार्गाच्या विस्तारासाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. तांत्रिक निविदेत एकूण १९ कंपन्या पात्र ठरल्या आहेत. लवकरच वित्तीय निविदा उघडून एजंसी निश्चित केल्या जातील. लोकसभा निवडणुकीनंतर या प्रक्रियेला गती मिळण्याची शक्यता आहे.

टॅग्स :nagpurनागपूरSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्गGadchiroliगडचिरोलीgondiya-acगोंदियाbhandara-acभंडारा