शहीद मुन्ना सेलूकर यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 22:09 IST2019-01-05T22:07:49+5:302019-01-05T22:09:40+5:30
अरुणाचल प्रदेशच्या तवांग येथे बिहार रेजिमेंटच्या सातव्या बटालियनमध्ये तैनात असलेले शिपाई मुन्ना सेलूकर यांना काल हिमस्खलनामुळे वीरमरण आले. आज शनिवारी नागपूर विमानाने नागपूर विमानतळावर शहीद सेलूकर याच्या पार्थिवावर प्रशासनाच्यावतीने उपजिल्हाधिकारी प्रियदर्शिनी बोरकर आणि जिल्हा सैनिक अधिकारी कॅप्टन दीपक लिमसे यानी पुष्पचक्र अर्पण केले.

शहीद मुन्ना सेलूकर यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अरुणाचल प्रदेशच्या तवांग येथे बिहार रेजिमेंटच्या सातव्या बटालियनमध्ये तैनात असलेले शिपाई मुन्ना सेलूकर यांना काल हिमस्खलनामुळे वीरमरण आले. आज शनिवारी नागपूर विमानाने नागपूर विमानतळावर शहीद सेलूकर याच्या पार्थिवावर प्रशासनाच्यावतीने उपजिल्हाधिकारी प्रियदर्शिनी बोरकर आणि जिल्हा सैनिक अधिकारी कॅप्टन दीपक लिमसे यानी पुष्पचक्र अर्पण केले.
शहीद मुन्ना सेलूकर हे अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील चुरणी येथील रहिवासी आहेत. आठ वर्षांपूर्वी ते भारतीय सैन्यात भरती झाले होते. तवांग येथे तैनात असताना त्यांना वीरमरण आले. चिखलदरा तालुक्यातीलत चुरणी या मूळगावी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.