दर्डा यांना पाहताच सलमानने मारली मिठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 23:49 IST2018-01-06T23:44:27+5:302018-01-06T23:49:22+5:30

कार्यक्रमस्थळी येताच सलमानने विजय दर्डा यांंना कडकडून मिठी मारली. ‘अखेर नागपुरात आपली भेट झालीच. खूप आनंद झाला, असे सद्गदित स्वरात सलमान म्हणाला. यावेळी ‘टायगर जिंदा है’ चित्रपटाच्या यशासाठी विजय दर्डा यांनी सलमानचे अभिनंदन केले आणि त्याला शुभेच्छा दिल्या.

Salman khan embraced to see Vijay Darda | दर्डा यांना पाहताच सलमानने मारली मिठी

दर्डा यांना पाहताच सलमानने मारली मिठी

ठळक मुद्दे‘टायगर जिंदा है’ चित्रपटाच्या यशासाठी शुभेच्छा दिल्या

आॅनलाईन लोकमत
नागपूर : सलमान खान जेव्हा नागपुरात आला तेव्हा त्याने विमानतळावरून कारमध्ये बसताच एका मान्यवराची आठवण केली. ते मान्यवर होते लोकमत मीडिया प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा. आपल्यासोबत असलेल्या पीपी या मित्राला सलमानने विजय दर्डा यांच्याबद्दल विचारले, मला त्यांना फोन करायचा होता. पण राहून गेले. तेवढ्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्याला सांगितले. ‘डोन्ट वरी, मी विजयबाबूंना आजच्या कार्यक्रमासाठी निमंत्रित केले आहे.’ कार्यक्रमस्थळी येताच सलमानने विजय दर्डा यांंना कडकडून मिठी मारली. ‘अखेर नागपुरात आपली भेट झालीच. खूप आनंद झाला, असे सद्गदित स्वरात सलमान म्हणाला. यावेळी ‘टायगर जिंदा है’ चित्रपटाच्या यशासाठी विजय दर्डा यांनी सलमानचे अभिनंदन केले आणि त्याला शुभेच्छा दिल्या. ‘आता बॉलिवूडला हॉलिवूडकडे ने. जागतिकस्तरावर आता तुझी क्रेझ आहे. बॉलिवूडला हॉलिवूडकडे नेण्यासाठी तुझे योगदान मोलाचे ठरेल, अशा शब्दात दर्डा यांनी आपल्या सदिच्छा व्यक्त केल्या.

Web Title: Salman khan embraced to see Vijay Darda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.