सलमान भाईने जाेपासली माणुसकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:08 AM2021-04-19T04:08:45+5:302021-04-19T04:08:45+5:30

नागपूर : जाती-धर्माच्या भिंती कितीही उंच केल्या तरी मानवतेच्या उंचीपेक्षा माेठ्या हाेऊ शकत नाही. एखाद्या संवेदनशील प्रसंगातून बरेचदा माणुसकी ...

Salman bhai jaepasali manusaki | सलमान भाईने जाेपासली माणुसकी

सलमान भाईने जाेपासली माणुसकी

Next

नागपूर : जाती-धर्माच्या भिंती कितीही उंच केल्या तरी मानवतेच्या उंचीपेक्षा माेठ्या हाेऊ शकत नाही. एखाद्या संवेदनशील प्रसंगातून बरेचदा माणुसकी अद्याप जिवंत असल्याचे दिसते. या माणुसकीचे रविवारी नागपुरात दर्शन घडले. कुणी जवळ येण्यास तयार नसलेल्या हिंदू व्यक्तीच्या प्रेताला एका मुस्लिम तरुणाने पुढे येऊन खांदा दिला आणि अंत्यसंस्कारही केला. त्यानंतर घरी जाऊन त्याने आपला राेजा साेडला.

नागपूरच्या खरबी परिसरात रविवारी एक दु:खद घटना घडली. येथील श्रीराम बेलखाेडे नामक व्यक्तीचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. तेव्हा साेबत हाेती त्यांची मुलगी व लहान मुलगा. शहाणा म्हणावा, अशी एकही व्यक्ती जवळ नव्हती. अशात बेलखाेडे यांचा काेराेनामुळे मृत्यू झाला की काय, असे सर्वांना वाटले. या भीतीने शेजारीपाजारी, नातेवाईक व मित्रही त्यांच्या घरी भटकले नाही. कुणी यायलाच तयार झाले नाही. सकाळी ११ वाजतापासून सायंकाळी ४ वाजतापर्यंत बेलखाेडे यांचा मृतदेह घरी तसाच पडून हाेता. ही बाब युवासेनेचे शहर सचिव सलमान रफिक खान यांना माहीत झाली. त्यांनी लगेच बेलखाेडे यांचे घर गाठले. स्वखर्चाने मयतीचे सामान आणले व शववाहिनी बाेलावून घेतली. आसपासचे लाेक यायला तयार नसल्याने त्यांनी मित्र व मशीद कमिटीच्या लाेकांना बाेलावले. लगेच १०-१२ लाेक मदतीला आले. त्यांनीच मग खांदा देऊन प्रेत दिघाेरी घाटापर्यंत पाेहचविले.

मुस्लिम असल्याने अर्थातच हिंदू अंत्यविधी कसा करायचा, त्याला ठावूक नव्हते. लगेच त्याच्या मित्रांना फाेन केला व प्रक्रिया जाणून घेतली आणि अंत्यसंस्कार पार पाडले. तापर्यंत सायंकाळचे ६ वाजून गेले हाेते. सर्व साेपस्कर आटाेपले आणि घरी पाेहचून आपला राेजा साेडला. हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक ठरलेल्या या घटनेमुळे सर्वत्र सलमान भाईचे काैतुक केले जात आहे.

Web Title: Salman bhai jaepasali manusaki

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.