विजेच्या धक्क्याने सालगड्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:08 IST2021-06-02T04:08:48+5:302021-06-02T04:08:48+5:30
नरखेड : शेतात पडून असलेल्या जिवंत विद्युत तारेला स्पर्श झाल्याने विजेचा जाेरात धक्का लागला. त्यात तरुण सालगड्याचा घटनास्थळीच मृत्यू ...

विजेच्या धक्क्याने सालगड्याचा मृत्यू
नरखेड : शेतात पडून असलेल्या जिवंत विद्युत तारेला स्पर्श झाल्याने विजेचा जाेरात धक्का लागला. त्यात तरुण सालगड्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना नरखेड पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील बानाेर शिवारात साेमवारी (दि.३१) घडली.
मनिराम उईके (४०, रा. कुटखेडी, ता. आमला, जि. छिंदवाडा, ह.मु. बानाेर, ता. नरखेड) असे मृताचे नाव असून, ताे मागील चार वर्षांपासून बानाेर येथील वामन बळीराम खुरसंगे यांच्याकडे सालगडी म्हणून कामाला हाेता. गाेठ्यात बांधून असलेला बैल सुटून शेतात पडून असलेल्या विद्युत तार याकडे जात असल्याची बाब मनिरामच्या लक्षात येताच, त्याने बैलाला वाचविण्यासाठी धाव घेतली. दरम्यान, जिवंत विद्युत तारेला स्पर्श झाल्याने मनिरामला जाेरदार विजेचा धक्का लागला. त्यात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मनिरामच्या अशा अकाली मृत्यूमुळे बानाेर गावात हळहळ व्यक्त हाेत आहे. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आहे. याप्रकरणी नरखेड पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, तपास बीट जमादार प्रकाश खाेपे करीत आहेत.
२९ मे राेजी आलेल्या वादळामुळे बानाेर शिवारातील शेतात विद्युत तार तुटल्या. याबाबत शेतकऱ्यांनी वीज कंपनीला सूचना दिली. मात्र तीन दिवस उलटूनही वीज कर्मचाऱ्यांनी दुरुस्ती किंवा या भागातील वीजपुरवठा खंडित करण्याची तसदी घेतली नाही. त्यातच तरुण शेतमजुराचा अपघाती मृत्यू झाला. यात वीज कंपनीचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा आराेप नागरिकांनी केला आहे.