एका लिपिकामुळे थांबले ६० अंगणवाडी पर्यवेक्षिकांचे वेतन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:09 IST2021-08-22T04:09:59+5:302021-08-22T04:09:59+5:30
नागपूर : एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत कार्यरत नागपूर जिल्ह्यातील अंगणवाडी पर्यवेक्षिका मे महिन्यापासून वेतनाच्या प्रतीक्षेत आहेत. महिला व बालकल्याण विभागाला ...

एका लिपिकामुळे थांबले ६० अंगणवाडी पर्यवेक्षिकांचे वेतन
नागपूर : एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत कार्यरत नागपूर जिल्ह्यातील अंगणवाडी पर्यवेक्षिका मे महिन्यापासून वेतनाच्या प्रतीक्षेत आहेत. महिला व बालकल्याण विभागाला पूर्णवेळ क्लार्क नसल्यामुळे पगारबिल काढण्यास अडचणी येत आहेत. काढलेल्या पगारबिलात वारंवार त्रुट्या निघत असल्याने पर्यवेक्षिकांचे वेतन झालेले नाही.
नागपूर जिल्ह्यात एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत ६० ते ६२ पर्यवेक्षिका कार्यरत आहेत. दोन वर्षांपासून पर्यवेक्षिकांचे वेतन पीएफएमएस प्रणालीद्वारे होते. पण, या प्रणालीद्वारे नियमित वेतन होत नसल्याच्या तक्रारी आहेत. पण, सध्या महिला व बालविकास विभागात पर्यवेक्षिकांचे वेतन काढण्यासाठी संबंधित क्लार्क उपलब्ध नाही. ज्या कर्मचाऱ्याकडून वेतनबिल काढण्यात येते, त्यात ट्रेझरी मोठ्या प्रमाणात चुका काढते. त्याचा परिणाम वेतनावर होत आहे. संबंधित विभागामध्ये कायमस्वरूपी लिपिक देण्यात यावा. पर्यवेक्षिकांचे वेतन नियमित व्हावे, अशी मागणी जिल्हा परिषद अंगणवाडी पर्यवेक्षिका संघटनेतर्फे करण्यात आली आहे. वेतनाची दखल तत्काळ न घेतल्यास कुणीही पर्यवेक्षिका कार्यालयीन माहिती देणार नाही, असा इशारा संघटनेच्या अध्यक्ष लक्ष्मी गजभिये, कोषाध्यक्ष रंजना कांबळे, सचिव संगीता चंद्रिकापुरे यांनी दिला.