संत निवृत्तिनाथ महाराज स्मरणोत्सव आजपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:52 IST2021-02-05T04:52:47+5:302021-02-05T04:52:47+5:30
नागपूर : हनुमान देवस्थान पंचकमिटी, ओमनगर सक्करदराच्या वतीने संत निवृत्तिनाथ महाराज स्मरणोत्सव २ ते ९ फेब्रुवारी या कालावधीत ...

संत निवृत्तिनाथ महाराज स्मरणोत्सव आजपासून
नागपूर : हनुमान देवस्थान पंचकमिटी, ओमनगर सक्करदराच्या वतीने संत निवृत्तिनाथ महाराज स्मरणोत्सव २ ते ९ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. कोरोना पार्श्वभूमी लक्षात घेता उत्सावाचे स्वरूप आटोपशीर राहील. दररोज सकाळी ५.३० वा काकडा, दुपारी १ ते ३ महिलांचे भजन, सायंकाळी हरिपाठ आणि रात्री ८ ते १०.३० महिलांचे हरिकीर्तन अशा धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ७ ते ९ फेब्रुवारीला रोजी रात्री ८.३० ला अनुक्रमे हभप विलास महाराज जिल्हारे, हभप उमेश महाराज बारापात्रे आणि हभप भीमराव कोठे महाराज यांचे कीर्तन होईल. एकादशीनिमित्त ९ फेब्रुवारीला दु. १२ ते ते २ वाजेपर्यंत हभप महेश नंदरधने महाराज यांचे हरिकीर्तन होईल, अशी माहिती हनुमान देवस्थान पंचकमिटी, श्री निवृत्तिनाथ महाराज स्मरणोत्सव समिती आणि माँ वैष्णोदेवी नवरात्र उत्सव समिती, ओमनगर यांनी दिली आहे.