साेलर मशीन व बॅटरी लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:07 IST2021-07-15T04:07:35+5:302021-07-15T04:07:35+5:30

काेंढाळी : अज्ञात आराेपीने राे-हाऊसमध्ये ठेवलेली साेलर प्लॅन्टची मशीन व बॅटरी चाेरून नेली. त्याची एकूण किंमत ३५ हजार रुपये ...

Sailor machine and battery lamps | साेलर मशीन व बॅटरी लंपास

साेलर मशीन व बॅटरी लंपास

काेंढाळी : अज्ञात आराेपीने राे-हाऊसमध्ये ठेवलेली साेलर प्लॅन्टची मशीन व बॅटरी चाेरून नेली. त्याची एकूण किंमत ३५ हजार रुपये आहे. ही घटना काेंढाळी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील विकासनगर, काेंढाळी येथे साेमवारी (दि.१२) सकाळी उघडकीस आली.

विनाेद शालिकराम गजभिये (४४, रा. विकासनगर, काेंढाळी) हे देखभाल करीत असलेल्या राे-हाऊसमधील खाेलीत साेलार प्लॅन्टची मशीन व बॅटरी ठेवली हाेती. दरम्यान अज्ञात आराेपीने दाराची कडी ताेडून आत प्रवेश केला व तेथील साेलर मशीन व बॅटरी असा एकूण ३५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चाेरून नेला. ही बाब लक्षात आल्यानंतर विनाेद गजभिये यांनी पाेलिसात तक्रार दाखल केली. याप्रकरणी काेंढाळी पाेलिसांनी भादंवि कलम ४५७ ४५४, ३८० अन्वये गुन्हा नाेंदविला असून, आराेपीचा शाेध सुरू केला आहे. पुढील तपास पाेलीस नाईक दारासिंग राठाेड करीत आहेत.

Web Title: Sailor machine and battery lamps