शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
2
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
4
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
5
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
6
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
7
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
8
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
9
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
10
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
11
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
12
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
13
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
14
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल
15
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
16
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
17
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
18
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
19
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
20
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार

हनी ट्रॅप - बोगस स्टिंग प्रकरण; साहिल सय्यद-नीलिमा जयस्वालचे डिजिटल पुरावे पोलिसांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2020 10:23 AM

अनेकांच्या मालमत्ता बळकावणारा कुख्यात गुन्हेगार साहिल सय्यद आणि त्याची मैत्रीण नीलिमा जयस्वाल तिवारी या दोघांच्या गुन्ह्याचा भरभक्कम पुरावा ठरू पाहणारे डिजिटल दस्तावेज पोलिसांच्या हाती लागले आहेत.

नरेश डोंगरे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हनी ट्रॅप आणि बोगस स्टिंंग आॅपरेशन करून अनेकांना ब्लॅकमेल करणारा, अनेकांच्या मालमत्ता बळकावणारा कुख्यात गुन्हेगार साहिल सय्यद आणि त्याची मैत्रीण नीलिमा जयस्वाल तिवारी या दोघांच्या गुन्ह्याचा भरभक्कम पुरावा ठरू पाहणारे डिजिटल दस्तावेज पोलिसांच्या हाती लागले आहेत. १० पेन ड्राईव्ह आणि अनेक मोबाईलमध्ये साहिल, नीलिमा आणि त्यांच्या टोळीतील साथीदारांच्या गैरकृत्यांची, कट-कारस्थानांची आणि त्यांनी केलेल्या अनेक डील (व्यवहार)चीही यात माहिती असल्याचे समजते.

राजकारणाचा बुरखा ओढून आणि नेत्यांचे पाठबळ मिळवून अनेकांना ब्लॅकमेल करणाऱ्या साहिल आणि टोळीच्या कुकृत्याविरुद्ध १३ जुलैला पाचपावली पोलिस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल झाला. त्यानंतर आरोपी साहिल, त्याची मैत्रीण नीलिमा आणि साथीदार फरार झाले. साहिलला एका आठवड्यानंतर पोलिसांनी पकडले. तर तब्बल १७ दिवस पोलिसांना झुलविल्यानंतर ३१ जुलैला नीलिमा जयस्वाल तिवारी आणि साहिलचा भाऊ तौफिक या दोघांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सावंगी (वर्धा)ला राशिद नामक व्यक्तीच्या सदनिकेतून ताब्यात घेतले.

या दोघांकडून पोलिसांनी १० पेन ड्राईव्ह आणि ६ मोबाईल जप्त केले. या दोन्हींची पोलिसांनी तपासणी केली असता त्यात साहिल, नीलिमा आणि त्याच्या टोळीतील साथीदारांनी अनेकांविरुद्ध रचलेल्या गुन्हेगारी कट कारस्थानांविषयीचे संभाषण तसेच षड्यंत्राची माहिती असल्याचे समजते. अनेक मालमत्तेसंदर्भातील कागदपत्रांच्या प्रती आणि त्यासंबंधी अनेकांसोबत त्यांनी केलेले संभाषण यातून पोलिसांच्या हाती लागले आहे. त्यांनी ज्यांना ब्लॅकमेल केले, त्याचाही पुरावा पेन ड्राईव्ह आणि मोबाईलमध्ये असल्याची सूत्रांची माहिती आहे.

‘ते’ गप्प बसल्यामुळेच हे निर्ढावले!विशेष म्हणजे, ज्यांना साहिल-नीलिमा टोळीने ब्लॅकमेल केले, त्यांनी स्वत:ची इज्जत झाकून ठेवण्यासाठी मोठी डील केली. मात्र, पोलिसांकडे जाण्याचे टाळले. ते गप्प बसल्यामुळेच साहिल, नीलिमा आणि टोळी निर्ढावल्याचा निष्कर्ष यातून निघत असल्याचे एका अधिकाºयाचे मत आहे. प्रकरण तपासाधीन असल्यामुळे या संदर्भात उघड बोलता येणे शक्य नाही, असे नाव न छापण्याच्या अटीवर एका अधिकाºयाने सांगून उपरोक्त माहिती दिली.

साहिल-नीलिमाची अदलाबदलीपाचपावलीच्या गुन्ह्यातील पीसीआरची मुदत संपल्यामुळे नीलिमा जयस्वाल तिवारी हिची आज न्यायालयीन कस्टडीत अर्थात कारागृहात रवानगी करण्यात आली. दुसरीकडे कारागृहात असलेला साहिल याला गुन्हे शाखेच्या पथकाने आज ताब्यात घेतले. अलेक्सिस हॉस्पिटल ब्लॅकमेलिंग प्रकरणात त्याला अटक करण्यात आली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी