शहरं
Join us  
Trending Stories
1
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
2
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
3
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
4
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
5
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांचा 'चतुर' मारा; ऋतुराज गायकवाड एकटा भिडला अन् विराटला... 
6
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
7
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
8
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
9
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
10
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
11
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
12
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
13
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
14
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
15
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
16
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
17
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
18
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
19
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
20
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार

नागपुरात सफाई कामगारांनी केली नगरसेविकेच्या पतीची धुलाई !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 8:44 PM

सफाई कर्मचाऱ्यांच्या कामात हस्तक्षेप करून त्यांना मानसिक व शारीरिक त्रास देणाऱ्या  नगरसेविकेच्या पतीची संतप्त सफाई कामगारांनी बेदम धुलाई केली.

ठळक मुद्देपोलीस ठाण्यासमोरही मारहाण : यशोधरानगरात तणाव

आॅनलाईन लोकमतनागपूर : सफाई कर्मचाऱ्यांच्या कामात हस्तक्षेप करून त्यांना मानसिक व शारीरिक त्रास देणाऱ्या  नगरसेविकेच्या पतीची संतप्त सफाई कामगारांनी बेदम धुलाई केली. यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी सकाळी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. संतप्त कर्मचाऱ्यांनी नंतर यशोधरानगर पोलीस ठाण्यात या प्रकरणाची तक्रार नोंदवली.सफाई कामगार संघटनेतर्फे मोहम्मद फिरोज यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, प्रभाग क्रमांक ३ च्या भाजपा नगरसेविका नसीम बानो इब्राहिम खान यांचे पती रोज प्रभागात सफाई करणाऱ्या  कर्मचाऱ्यांना दमदाटी करतात. त्यांच्या हजेरीचे रजिस्टर हातात घेऊन मनात येईल त्याची गैरहजेरी लावतात. संबंध नसताना त्यांना मानसिक त्रास देतात. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांचा हा त्रास कर्मचाऱ्यांना सुरू आहे. यासंबंधाने उजर केल्यास ते अपमानास्पद वागणूक देतात. बुधवारी सकाळी असाच प्रकार झाला. एका कर्मचाऱ्यासोबत त्यांनी वाद घालून अपमानित केले. हा प्रकार पाहून अन्य काही महिला कर्मचाऱ्यांनी हरकत घेतली असता इब्राहिम खान त्यांच्यासोबतही वाद घालू लागले. त्यांच्या वर्तनाने आधीच त्रस्त असलेल्या महिला-पुरुष कर्मचाऱ्यांचा रोष उफाळून आला. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी इब्राहिम यांना बेदम मारहाण केली. मारहाण करण्यात काही महिलाही पुढे होत्या. ते यशोधरानगर पोलीस ठाण्यात धावत गेले असता, जमावाने त्यांचा पाठलाग करून त्यांना ठाण्याच्या परिसरातही चोप दिला. त्यानंतर संतप्त कर्मचाऱ्यांनी पोलीस ठाण्याला घेराव घातला. त्यामुळे दुपारी १२ वाजेपर्यंत पोलीस ठाण्याच्या आवारात तणाव होता. पोलिसांनी जमावाची कशीबशी समजूत काढून त्यांना शांत केले.महापालिका आयुक्तांकडेही तक्रारअधिकार नसताना नगरसेविकेचा पती कर्मचाऱ्यांना त्रास देतो, त्यांना दमदाटी करतो, अशाप्रकारची लिखित तक्रार कर्मचाऱ्यांनी महापालिका आयुक्तांकडे दिली. हिवाळी अधिवेशन सुरू असताना सत्तापक्षातील एका नगरसेविकेच्या पतीने चालविलेली दादागिरी या प्रकरणातून पुढे आल्यामुळे प्रकरण चिघळण्याचे संकेत आहेत.

टॅग्स :crimeगुन्हेnagpurनागपूर