राेख रकमेसह साेन्याचे दागिने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:12 IST2021-09-15T04:12:41+5:302021-09-15T04:12:41+5:30

काेंढाळी/बाजारगाव : अज्ञात चाेरट्याने घरफाेडी करीत राेख रक्कम व साेन्याचे दागिने असा एकूण ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चाेरून ...

Saenya's jewelery lamp with rake amount | राेख रकमेसह साेन्याचे दागिने लंपास

राेख रकमेसह साेन्याचे दागिने लंपास

काेंढाळी/बाजारगाव : अज्ञात चाेरट्याने घरफाेडी करीत राेख रक्कम व साेन्याचे दागिने असा एकूण ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चाेरून नेला. ही घटना काेंढाळी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील बाजारगाव येथे साेमवारी (दि.१३) मध्यरात्रीच्या सुमारास घडली.

कृष्णानंद लंबाेदर झा (६०, रा.बाजारगाव) यांच्या घराच्या मागील दाराचा काेयंडा ताेडून चाेरट्याने घरात प्रवेश केला. यात चाेरट्याने घरातील एका सुटकेसमध्ये ठेवलेले साेन्याचे मंगळसूत्र व राेख १० हजार रुपये असा एकूण ५० हजारांचा मुद्देमाल चाेरून नेला. ही बाब लक्षात येताच, झा यांनी पाेलिसात तक्रार दाखल केली. या प्रकरणी काेंढाळी पाेलिसांनी भादंवि कलम ४५७, ३८०, ३४ अन्वये गुन्हा नाेंदविला असून, या घटनेचा पुढील तपास पाेलीस उपनिरीक्षक देवेंद्र साेनावणे करीत आहेत.

Web Title: Saenya's jewelery lamp with rake amount