भाच्यासाठी मुलगी बघावयास गेलेल्या मामाच्या मृत्यूने हळहळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2022 20:45 IST2022-09-24T20:44:52+5:302022-09-24T20:45:20+5:30
Nagpur News भाच्यासाठी मुलगी बघावयास गेलेल्या मामाचा हृद्यविकाराच्या झटक्याने मृत्यू ओढवला.

भाच्यासाठी मुलगी बघावयास गेलेल्या मामाच्या मृत्यूने हळहळ
नागपूर : भाच्यासाठी मुलगी बघावयास गेलेल्या मामाचा हृद्यविकाराच्या झटक्याने मृत्यू ओढवला. उमरेड शहर काँग्रेस कमिटीचे माजी महासचिव फजितराव बालाजी आमगावकर (७५, रा.जोगीठाणा, उमरेड) असे त्यांचे नाव असून, या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
शुक्रवारी १२ वाजताच्या सुमारास फजितराव आमगावकर अड्याळ (पवनी) येथे भाच्यासाठी मुलगी बघावयास उमरेड येथून एसटीने निघाले. अड्याळ येथे एसटीतून उतरताच, त्यांच्या छातीमध्ये दुखणे सुरू झाले. लागलीच त्यांनी लगतच असलेल्या मंदिराचा आडोसा घेतला. त्रास, वेदना अधिक वाढल्यानंतर क्षणभरातच त्यांची प्राणज्योत मालवली. फजितराव आमगावकर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी भिवापूर मार्गस्थित स्मशानभूमीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात ४ मुले आणि मोठा आप्तपरिवार आहे.