लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील दाट लोकवस्ती असलेल्या सदर व छावणीवरून जाणारा उड्डाणपूल आता पूर्ण झालेला आहे. २८ डिसेंबर रोजी पुलाचे काम पूर्ण होईल, असे सांगितले जात असले तरी, दोन दिवसांपूर्वीच हा वाहतुकीसाठी तयार झालेला आहे. या पुलावर लोड टेस्टिंग व लायटिंग टेस्टिंगचे कामही पूर्ण झाले आहे. परंतु उद्घाटन कधी होणार, हा प्रश्न मात्र कायम आहे.या पुलावरून ४० टन वजनाने ६-६ ट्रक एकामागे एक चालू शकतात. आता हा पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे तयार आहे. परंतु तो वाहतुकीसाठी कधी खुला होणार, याची नागरिकांना प्र्रतीक्षा आहे. या पुलाच्या बांधकामामुळे या रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी बराच त्रास सहन केला. त्यामुळे पुलाचे काम पूर्ण झाल्याने ते आता पुलावरून जाण्याची प्रतीक्षा करीत आहेत. पूल वाहतुकसाठी खुला झाल्यास येथील वाहतुकीची समस्याही मोठ्या प्रमाणावर दूर होईल. २१७ कोटी रुपये खर्चाचा या पुलाचे काम २०१८ मध्ये सुरू झाले. अगोदर ३१ मार्च २०१९ मध्ये या पुलाचे काम पूर्ण होणार होते. ती वाढवून ऑगस्ट २०१९ करण्यात आली. यानंतर २८ डिसेंबर २०१९ ची तारीख निश्चित करण्यात आली.१९९९ पासून होती पूल बनविण्याची योजनासदर रेसिडेन्सी उड्डाणपुलाचे बांधकाम अगोदर सार्वजनिक बांधकाम विभाग करणार होते. परंतु ते काम सुरू करू शकले नाही. यानंतर २०१४ मध्ये केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मंत्री पदाचा पदभार स्वीकारताच शहरातील काही रस्त्यांचे प्रकल्प एनएचआयकडे सोपविले. यात सदर उड्डाणपुलाचाही समावेश आहे.
नागपुरातील सदरचा उड्डाणपूल वाहतुकीसाठी सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 23:10 IST
शहरातील दाट लोकवस्ती असलेल्या सदर व छावणीवरून जाणारा उड्डाणपूल आता पूर्ण झालेला आहे. २८ डिसेंबर रोजी पुलाचे काम पूर्ण होईल, असे सांगितले जात असले तरी, दोन दिवसांपूर्वीच हा वाहतुकीसाठी तयार झालेला आहे.
नागपुरातील सदरचा उड्डाणपूल वाहतुकीसाठी सज्ज
ठळक मुद्देलोड टेस्टिंगही झाली : उद्घाटनावर प्रश्नचिन्ह