मोरभवनात स्थानांतरित होणार ग्रामीण बससेवा

By Admin | Updated: June 1, 2014 01:04 IST2014-06-01T01:04:03+5:302014-06-01T01:04:03+5:30

गणेशपेठ येथील मध्यवर्ती बस स्थानकावरून क्षमतेपेक्षा अधिक बसफेर्‍या सुरू आहेत. त्यामुळे मुख्य बस स्थानकावरील ताण कमी करण्याच्या उद्देशाने येथील ग्रामीण भागातील बससेवा मोरभवन बस स्थानकावर स्थानांतरित

Rural bus service to be shifted to Morabhan | मोरभवनात स्थानांतरित होणार ग्रामीण बससेवा

मोरभवनात स्थानांतरित होणार ग्रामीण बससेवा

एसटीचा निर्णय : गणेशपेठ बसस्थानक घेणार मोकळा श्‍वास
वसीम कुरैशी - नागपूर
गणेशपेठ येथील मध्यवर्ती बस स्थानकावरून क्षमतेपेक्षा अधिक बसफेर्‍या सुरू आहेत. त्यामुळे  मुख्य बस स्थानकावरील ताण कमी करण्याच्या उद्देशाने येथील ग्रामीण भागातील बससेवा  मोरभवन बस स्थानकावर स्थानांतरित करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळाने  (एसटी) घेतला आहे. ग्रामीण भागातील जवळपास २00 बसफेर्‍या मोरभवन येथे स्थानांतरित  करण्यात येत आहे. यामुळे गणेशपेठ बसस्थानकाला मोकळा श्‍वास घेता येईल.
 गणेशपेठ येथील मध्यवर्ती बसस्थानकावरून सध्या २४00 बस फेर्‍या आहेत. येथे मोठय़ा  प्रमाणावर एसटीची वर्दळ असते. मध्यवर्ती बसस्थानकाचा परिसर लहान पडू लागला आहे. यातच  परिसरात अतिक्रमण वाढल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. पूर्वी गणेशपेठ मध्यवर्ती  स्थानावर नागपूर ग्रामीण भागातील बससाठी असलेल्या परिसरात रामटेकच्या बसेससाठी स्वतंत्र  प्लॅटफॉर्म तयार करण्याचा प्रस्ताव होता.
परंतु तो रद्द करीत २00 फेर्‍या मोरभवनला स्थानांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र यात  नागपूर ग्रामीण भागातील सर्वच बसफेर्‍या स्थानांतरित करण्याचा विचार केला जात आहे.
एक हजारापर्यंंत फेरी वाढवणार
मोरभवन बस स्थानकावरून सध्या बसेसच्या ६८५ फेर्‍या चालत आहेत. त्या एक हजारापर्यंंत  वाढविण्यात येणार आहे.
मोरभवन टाकणार कात
सीताबर्डीतील मोरभवन बसस्थानाकाचे रूप आता लवकरच बदलेल. ग्रामीण भागातील बसफेर्‍या  स्थानांतरित करण्यात येत असल्याने एसटी महामंडळाने नविनीकरणाचे काम सुरू केले आहे.  येथील ७ प्लॅटफॉर्म ऐवजी आता १0 प्लॅटफॉर्म राहतील. पावसाची शक्यता लक्षात घेऊन  फ्लॅटफॉर्मची उंची वाढविण्यात येत आहे. मोरभवनातील बस स्थानकाच्या विकासाचा मुद्दा  लोकमतने नेहमीच लावून धरला आहे, हे विशेष. या निर्णयामुळे मोरभवन बसस्थानक आता कात  टाकणार हे निश्‍चित.
 

Web Title: Rural bus service to be shifted to Morabhan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.