शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
4
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
6
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
7
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
8
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
9
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
10
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
11
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
12
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
13
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
14
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
15
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
16
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
17
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
18
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
19
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
20
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा

नागपूर  ग्रामीण भागांमध्ये शाळांनी नाकारली तंबाखूमुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 00:56 IST

ग्रामीण भागांमध्ये शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात गुटखा, खर्रा, तंबाखूचे व्यसन जडलेले असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे शासनाने शाळेमधून तंबाखूमुक्त करण्यासाठी अभियान राबविले आहे. या अभियानात नागपूर जिल्हा परिषदेच्या १५३६ शाळांपैकी १७ सहभागी झाल्या आहेत.

ठळक मुद्देतंबाखूमुक्त अभियानात केवळ १७ शाळा पास : सलाम फाऊंडेशनच्या अहवालातून उघड

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : ग्रामीण भागांमध्ये शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात गुटखा, खर्रा, तंबाखूचे व्यसन जडलेले असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे शासनाने शाळेमधून तंबाखूमुक्त करण्यासाठी अभियान राबविले आहे. या अभियानात नागपूर जिल्हा परिषदेच्या १५३६ शाळांपैकी १७ सहभागी झाल्या आहेत. ही बाब सलाम मुंबई फाऊंडेशनच्या एका अहवालातून उघड झाली आहे.इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर आणि जागतिक आरोग्य संघटनेनुसार धूम्ररहित तंबाखू पदार्थात २८ कर्कजन्य रसायने असतात. कोणताही प्राणी तंबाखूची पाने खात नाही. सापही तंबाखूच्या शेतात जात नाही. तरीही सर्वात सूज्ञ समजला जाणारा मनुष्य तंबाखूचे सेवन करून स्वत:चेच जीवन नरकमय बनवत आहे. आज लहान मुलेसुद्धा तंबाखूच्या विळख्यात अडकली आहेत. शालेय विद्यार्थ्यांमध्ये तंबाखूचे सेवन कमी करण्यासाठी शासनातर्फे हे अभियान राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत नागपूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जिल्ह्यातील १५३६ शाळा तंबाखूमुक्त मानस बाळगला होता. त्यासाठी शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारीही प्रयत्नशील होते. यासाठी शासनाने ११ निकष ठेवले होते. शाळा तंबाखूमुक्त असल्याबाबतच्या ११ निकषाची माहिती शाळांना आॅनलाईन सलाम मुंबई फाऊंडेशनच्या अ‍ॅपवर नोंदवायची होतीे. आतापर्यंत जि.प.च्या १५३६ पैकी १७ शाळांनी तंबाखूमुक्ती साधली असल्याचे या अ‍ॅपवरील नोंदणीवरून दिसून येत आहे. असे असले तरी १४१९ शाळा अद्याप तंबाखूमुक्तीपासून दूर आहेत. १३९१ शाळांनी तर प्रयत्नही केलेले दिसत नाहीत. या निकषाची शाळांनी करायची होती अंमलबजावणीशाळेजवळ फलक लावणे आवश्यक , शालेय परिसरात तंबाखू वापरास प्रतिबंध, तंबाखू नियंत्रण समितीची स्थापना, धूम्रपान व तंबाखूचा वापर करणे हा गुन्हा असल्याचा फलक शाळा परिसरात लावणे, शाळेत तंबाखूचे दुष्परिणाम आणि तंबाखू नियंत्रण कायद्याबाबत पोस्टर्स लावणे, तंबाखू विरोधी संदेश शालेय साहित्यांवर चिटकवणे, तंबाखू विरोधी २००३ कायद्याची एक प्रत मुख्याध्यापकांकडे उपलब्ध असणे, शाळा तंबाखूमुक्त शाळा असल्याचा फलक प्रवेशद्वाराजवळ लावणे, तंबाखू नियंत्रण उपक्रमात सक्रिय विद्यार्थी, मुख्याध्यापकांचा सत्कार करणे, शाळेपासून १०० मीटर परिसरात तंबाखू विक्री व उत्पादनावर बंदी, शाळेच्या नियमित आरोग्य उपक्रमांमध्ये तंबाखू नियंत्रणाचा समावेश आदी.

टॅग्स :Tobacco Banतंबाखू बंदीSchoolशाळा