ग्रामीण भागात आतापर्यंत २,१०४ कोरोनाबाधितांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:08 IST2021-05-13T04:08:50+5:302021-05-13T04:08:50+5:30
सावनेर/ काटोल/नरखेड/उमरेड/ कळमेश्वर/कुही/ कामठी/मौदा/ हिंगणा : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्याने मृत्यूंचे प्रमाण अधिक ...

ग्रामीण भागात आतापर्यंत २,१०४ कोरोनाबाधितांचा मृत्यू
सावनेर/ काटोल/नरखेड/उमरेड/ कळमेश्वर/कुही/ कामठी/मौदा/ हिंगणा : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्याने मृत्यूंचे प्रमाण अधिक आहे. मंगळवारी मध्यरात्रीच्या अहवालानुसार, जिल्ह्यातील तेरा तालुक्यातील १९ रुग्णांचा मृत्यू झाली. त्यामुळे मृतांची संख्या २,१०४ इतकी झाली. ग्रामीण भागात ४,७५१ संशयित रुग्णांच्या चाचण्या करण्यात आली. त्यात १,२०० (२५.२५ टक्के) रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या आता १,३३,०३४ इतकी झाली आहे. यापैकी १,०९,६१२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. बुधवारी ही संख्या ३,०६७ इतकी होती. सध्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २१,२४३ इतकी आहे. सावनेर तालुक्यात ४४ रुग्णांची भर पडली. यात सावनेर शहरातील ३ तर ग्रामीणमधील ४१ रुग्णांचा समावेश आहे. कामठी तालुक्यात ३९६ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात ३१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.
नरखेड तालुक्यात १०९ रुग्णांची भर पडली. यात कळमेश्वर शहरातील १३ तर ग्रामीण भागातील ९६ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २,३३१ तर शहरात ४७५ इतकी झाली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगाव अंतर्गत येणाऱ्या गावात (२५), जलालखेडा प्राथमिक आरोग्य केंद्र (८), मोवाड प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावात ६३ रुग्णांची नोंद झाली.
काटोल तालुक्यात ४११ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात ४८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात काटोल शहरातील १८ तर ग्रामीण भागातील ३० रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागात कचारी सावंगा केंद्रांतर्गत ५ कोंढाळी केंद्र (१३) तर येनवा केंद्रांतर्गत येणाऱ्या गावात १२ रुग्णांची नोंद झाली.
कुही तालुक्यात विविध केंद्रांवर १३९ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात २६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात कुही येथे ३, मांढळ (६), वेलतूर (५), साळवा (४) तर तितूर येथील ८ रुग्णांचा समावेश आहे.
रामटेक तालुक्यात २३ रुग्णांची भर पडली. यात शहरातील १ तर ग्रामीण मधील २२ रुग्णांचा समावेश आहे. तालुक्यात आतापर्यंत ६,३७९ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. यातील ५,१८२ रुग्ण कोरोनामुक्त झाले. सध्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १,१९० इतकी झाली आहे. उमरेड तालुक्यात ८१ रुग्णांची भर पडली. यात शहरातील २५ तर ग्रामीण भागातील ५६ रुग्णांचा समावेश आहे.
हिंगणा तालुक्यात ३४३ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. यात ४८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात वानाडोंगरी येथे सर्वाधिक ९ रुग्णांची नोंद झाली. तालुक्यात आतापर्यंत ११,२०० रुग्णांची नोंद झाली आहे. यातील ९,०८६ रुग्ण कोरोनामुक्त झाले. बुधवारी एका रुग्णाचा मृत्यू झाली. त्यामुळे मृतांची संख्या २४६ इतकी झाली आहे.
कळमेश्वर तालुक्यात पुन्हा स्फोट
कळमेश्वर तालुक्यात कोरोनाबाधितांचा ग्राफ सातत्याने वाढतो आहे. तालुक्यात २५० रुग्णांची आणखी भर पडली. यात कळमेश्वर-ब्राह्मणी न.प.क्षेत्रातील १६३ तर ग्रामीण भागातील ८७ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागात तेलकामठी येथे सर्वाधिक ८ रुग्णांची नोंद झाली.