शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
4
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
5
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
6
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
7
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
8
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
9
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
10
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
11
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
13
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
14
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
15
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
16
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
17
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
18
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
19
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
20
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
Daily Top 2Weekly Top 5

रुपालीची आत्महत्या संशयाच्या भोवऱ्यात

By admin | Updated: October 11, 2014 02:51 IST

अंजनगाव सुर्जी पोलीस ठाण्यांतर्गत खोडगाव येथील रुपाली तुरखडे आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.

अमरावती : अंजनगाव सुर्जी पोलीस ठाण्यांतर्गत खोडगाव येथील रुपाली तुरखडे आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. राज्य महिला आयोगाच्या सदस्य आशा मिरगे यांनी केलेल्या चौकशीत रुपालीच्या आत्महत्येवर संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणाची सविस्तर माहिती त्यांनी येथे पत्रपरिषदेत दिलीे.'लोकमत'ने केलेल्या पाठपुराव्यानंतर या प्रकरणाची दखल महिला आयोगाने घेतली. खोडगाव येथील रहिवासी रुपाली सतीश तुरखडे हिचा मृतदेह २ आॅक्टोबर रोजी विहिरीत आढळून आला. रुपालीची हत्या करण्यात आल्याचा आरोप तिचे काका राजेंद्र लंगोटे यांनी केला व रुपालीच्या सासरच्या मंडळींविरुध्द पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. रुपालीचा हुंड्याकरिता मानसिक व शारीरिक छळ करुन तिची हत्या करण्यात आली व नंतर मृतदेह विहिरीत टाकण्यात आल्याचा आरोप पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत लंगोटे यांनी केला आहे. या प्रकरणाची तक्रार रुपालीच्या नातेवाईकांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे केली आहे. त्या अनुषंगाने आशा मिरगे यांनी चौकशी केली असता रुपालीची हत्या करुन तिचा मृतदेह विहिरीत टाकण्यात आला असावा, असा संशय व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)