धावत्या स्काॅर्पिओने घेतला पेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:09 IST2021-04-08T04:09:15+5:302021-04-08T04:09:15+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क काेंढाळी : धावत्या स्काॅर्पिओने अचानक पेट घेतला आणि संपूर्ण वाहन जळून खाक झाले. प्रसंगावधान साधत कुटुंबीय ...

The running Scorpio took a bite | धावत्या स्काॅर्पिओने घेतला पेट

धावत्या स्काॅर्पिओने घेतला पेट

लाेकमत न्यूज नेटवर्क

काेंढाळी : धावत्या स्काॅर्पिओने अचानक पेट घेतला आणि संपूर्ण वाहन जळून खाक झाले. प्रसंगावधान साधत कुटुंबीय वाहनातून बाहेर निघाल्याने ते थाेडक्यात बचावले. ही घटना काेंढाळी-अमरावती महामार्गावरील नांदाेरा फाटा परिसरात साेमवारी (दि.५) रात्री १२ वाजताच्या सुमारास घडली.

अमाेल रमेश आत्राम (३३, रा. बेसा राेड, नागपूर) हे पत्नी बबीता अमाेल आत्राम (३०), आई सुशिला रमेश आत्राम (६०) व मुलासाेबत एमएच-१४/एडी-९९९१ क्रमांकाच्या स्काॅर्पिओ वाहनाने अमरावतीकडून नागपूरकडे येत हाेते. दरम्यान, नांदाेरा फाटा परिसरातील निर्मल सुतगिरणीसमाेर स्काॅर्पिओच्या बाेनेटमधून धूर निघताना दिसला. लागलीच त्यांनी वाहन थांबवून कुटुंबीयांना वाहनाबाहेर काढले. काही क्षणातच वाहनाने पेट घेतला व आगीचा भडका उडाला. घटनेची माहिती मिळताच काेंढाळी पाेलीस ठाण्याचे पाेलीस उपनिरीक्षक देवेंद्र साेनावले, हेड काॅन्स्टेबल संदीप बेले, मंगेश धारपुरे, हाेमेश्वर वाईलकर, दुलसिंग आडे, तुळशीराम चामटे यांच्या चमूने घटनास्थळ गाठले. पाेलिसांनी मिळेल तेथून पाणी घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला, मात्र ताेपर्यंत संपूर्ण वाहन जळून खाक झाले. याप्रकरणी काेंढाळी पाेलिसांनी नाेंद करून तपास सुरू केला आहे.

Web Title: The running Scorpio took a bite