‘रन फॉर ७५’; नागपूरकर रविवारी धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2022 20:05 IST2022-08-12T20:04:24+5:302022-08-12T20:05:12+5:30

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘रन फॉर ७५’चे आयोजन विभागीय क्रीडा संकुल, मानकापूर येथून १४ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजता करण्यात आले आहे.

'Run for 75'; Nagpurkar will run tomorrow | ‘रन फॉर ७५’; नागपूरकर रविवारी धावणार

‘रन फॉर ७५’; नागपूरकर रविवारी धावणार

नागपूर : भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनात देशभक्तीची भावना व स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात, या उद्देशाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त उपसंचालक क्रीडा व युवक सेवा, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, एनएसएस व एनसीसी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘रन फॉर ७५’चे आयोजन विभागीय क्रीडा संकुल, मानकापूर येथून १४ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजता करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचा शुभारंभ जिल्हाधिकारी आर. विमला यांच्या हस्ते होणार आहे. ‘रन फॉर ७५’चा मार्ग विभागीय क्रीडा संकुल, मानकापूर येथून सुरू होणार असून पागलखाना व चौक, छावनी चौक, सदर, अशोका हॉटेल, परत याच उलट मार्गे विभागीय क्रीडा संकुल येथे समाप्त होईल. या उपक्रमात खेळाडूंनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडाधिकारी पल्लवी धात्रक यांनी केले आहे.

Web Title: 'Run for 75'; Nagpurkar will run tomorrow