शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
4
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
5
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
6
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
7
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
8
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
9
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
10
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
11
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
12
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
13
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
14
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
15
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
16
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
17
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
18
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
19
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
20
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान

शासकीय-प्रशासकीय बैठकांमध्येच नियमांची पायमल्ली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 00:48 IST

जिल्ह्यातील प्रशासकीय कार्यांना गती देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. कोविड-१९ ला घाबरण्याची नव्हे तर सावधगिरी बाळगून त्याचा सामना करण्याच्या मंत्रासह जीवन पुन्हा रुळावर आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. जिल्ह्यात बैठकांचे सत्र सुरू आहे. मंत्र्यांपासून ते अधिकाऱ्यांपर्यंत बैठकीत सहभागी होत आहेत. परंतु अनेक ठिकाणी बैठकींमध्ये सुरक्षित अंतराच्या नियमांची पायमल्ली होताना दिसून येते.

ठळक मुद्देसावधगिरी बाळगण्याची गरज : अधिकारी झाले सतर्क

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्ह्यातील प्रशासकीय कार्यांना गती देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. कोविड-१९ ला घाबरण्याची नव्हे तर सावधगिरी बाळगून त्याचा सामना करण्याच्या मंत्रासह जीवन पुन्हा रुळावर आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. जिल्ह्यात बैठकांचे सत्र सुरू आहे. मंत्र्यांपासून ते अधिकाऱ्यांपर्यंत बैठकीत सहभागी होत आहेत. परंतु अनेक ठिकाणी बैठकींमध्ये सुरक्षित अंतराच्या नियमांची पायमल्ली होताना दिसून येते.आतातर जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीमध्ये कोविड-१९ पॉझिटिव्ह नगरसेवक सहभागी झाल्याच्या वृत्ताने प्रशासन हादरले आहे. विभागीय आयुक्त कार्यालयापासून ते जिल्हाधिकारी कार्यालय व पालकमंत्र्यांच्या कार्यालयात बैठकींचे सत्र सुरू झाले आहे. परिस्थिती सामान्य करणे हाच या बैठकीचा एकमेव उद्देश आहे. चांगल्या उद्देशाने होत असलेल्या या बैठकांमध्ये काही लोक मात्र सुरक्षित अंतर राखण्याच्या नियमांची पायमल्ली करीत आहेत. प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे की, बैठकीत येणारे कुणाला ना कुणाला सोबत घेऊन येतात. ते लोक बैठकीत सामील होत नाही. परंतु त्यांच्यामुळे गर्दी होत आहे. बैठकीत एखाद्या मंत्र्याची उपस्थिती असेल तर ही गर्दी आणखी वाढते. तसे पाहिले तर बैठकीपूर्वी खुर्च्या सुरक्षित अंतरावर दूर दूर ठेवल्या जातात. लोकही ठरवून दिलेल्या जागेवरच बसतात. परंतु बैठक संपताच सुरक्षित अंतर दूर होते आणि लोक एकत्र येतात.जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याची माहिती मिळताच प्रशासन सतर्क झाले आहे. त्यांचे म्हणणे आहे की, आता सुरक्षित अंतर काटेकोरपणे पाळले जाईल. अनेक अधिकाऱ्यांनी आपल्या टेबलवर ग्लास बनवले आहेत, जेणेकरून बाहेरून येणाऱ्यांपासून ठराविक अंतर राखता येईल. समोरच्या खुर्च्याही अंतर राखून ठेवण्यात आल्या आहेत.सावधगिरी बाळगली जात आहेप्रशासकीय व शासकीय बैठकींचे आयोजन अतिशय सावधगिरीने केले जात आहे. ‘मिशन बिगिन अगेन’साठी ते आवश्यकही आहे. बैठकीत सुरक्षित अंतराच्या नियमांचे पालन होत आहे. मास्क वापरणे व सॅनिटायझर आवश्यक करण्यात आले आहे. सावधगिरी बाळगत बैठका सुरूच राहतील. कन्हानमध्ये पार पडलेल्या बैठकीत कोरोना पॉझिटिव्ह नगरसेवक सहभागी कसे झाले, याची चौकशी सुरू आहे. या बैठकीत नगराध्यक्ष व उपाध्यक्षांनाच आमंत्रित करण्यात आले होते.रवींद्र ठाकरेजिल्हाधिकारी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर