शासकीय-प्रशासकीय बैठकांमध्येच नियमांची पायमल्ली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 12:47 AM2020-07-17T00:47:16+5:302020-07-17T00:48:34+5:30

जिल्ह्यातील प्रशासकीय कार्यांना गती देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. कोविड-१९ ला घाबरण्याची नव्हे तर सावधगिरी बाळगून त्याचा सामना करण्याच्या मंत्रासह जीवन पुन्हा रुळावर आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. जिल्ह्यात बैठकांचे सत्र सुरू आहे. मंत्र्यांपासून ते अधिकाऱ्यांपर्यंत बैठकीत सहभागी होत आहेत. परंतु अनेक ठिकाणी बैठकींमध्ये सुरक्षित अंतराच्या नियमांची पायमल्ली होताना दिसून येते.

Rules are violated only in government-administrative meetings | शासकीय-प्रशासकीय बैठकांमध्येच नियमांची पायमल्ली

शासकीय-प्रशासकीय बैठकांमध्येच नियमांची पायमल्ली

Next
ठळक मुद्देसावधगिरी बाळगण्याची गरज : अधिकारी झाले सतर्क

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्ह्यातील प्रशासकीय कार्यांना गती देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. कोविड-१९ ला घाबरण्याची नव्हे तर सावधगिरी बाळगून त्याचा सामना करण्याच्या मंत्रासह जीवन पुन्हा रुळावर आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. जिल्ह्यात बैठकांचे सत्र सुरू आहे. मंत्र्यांपासून ते अधिकाऱ्यांपर्यंत बैठकीत सहभागी होत आहेत. परंतु अनेक ठिकाणी बैठकींमध्ये सुरक्षित अंतराच्या नियमांची पायमल्ली होताना दिसून येते.
आतातर जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीमध्ये कोविड-१९ पॉझिटिव्ह नगरसेवक सहभागी झाल्याच्या वृत्ताने प्रशासन हादरले आहे. विभागीय आयुक्त कार्यालयापासून ते जिल्हाधिकारी कार्यालय व पालकमंत्र्यांच्या कार्यालयात बैठकींचे सत्र सुरू झाले आहे. परिस्थिती सामान्य करणे हाच या बैठकीचा एकमेव उद्देश आहे. चांगल्या उद्देशाने होत असलेल्या या बैठकांमध्ये काही लोक मात्र सुरक्षित अंतर राखण्याच्या नियमांची पायमल्ली करीत आहेत. प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे की, बैठकीत येणारे कुणाला ना कुणाला सोबत घेऊन येतात. ते लोक बैठकीत सामील होत नाही. परंतु त्यांच्यामुळे गर्दी होत आहे. बैठकीत एखाद्या मंत्र्याची उपस्थिती असेल तर ही गर्दी आणखी वाढते. तसे पाहिले तर बैठकीपूर्वी खुर्च्या सुरक्षित अंतरावर दूर दूर ठेवल्या जातात. लोकही ठरवून दिलेल्या जागेवरच बसतात. परंतु बैठक संपताच सुरक्षित अंतर दूर होते आणि लोक एकत्र येतात.
जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याची माहिती मिळताच प्रशासन सतर्क झाले आहे. त्यांचे म्हणणे आहे की, आता सुरक्षित अंतर काटेकोरपणे पाळले जाईल. अनेक अधिकाऱ्यांनी आपल्या टेबलवर ग्लास बनवले आहेत, जेणेकरून बाहेरून येणाऱ्यांपासून ठराविक अंतर राखता येईल. समोरच्या खुर्च्याही अंतर राखून ठेवण्यात आल्या आहेत.

सावधगिरी बाळगली जात आहे
प्रशासकीय व शासकीय बैठकींचे आयोजन अतिशय सावधगिरीने केले जात आहे. ‘मिशन बिगिन अगेन’साठी ते आवश्यकही आहे. बैठकीत सुरक्षित अंतराच्या नियमांचे पालन होत आहे. मास्क वापरणे व सॅनिटायझर आवश्यक करण्यात आले आहे. सावधगिरी बाळगत बैठका सुरूच राहतील. कन्हानमध्ये पार पडलेल्या बैठकीत कोरोना पॉझिटिव्ह नगरसेवक सहभागी कसे झाले, याची चौकशी सुरू आहे. या बैठकीत नगराध्यक्ष व उपाध्यक्षांनाच आमंत्रित करण्यात आले होते.
रवींद्र ठाकरे
जिल्हाधिकारी

Web Title: Rules are violated only in government-administrative meetings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.