शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

‘आरटीओ’च्या नियमांची पायमल्ली

By admin | Updated: July 8, 2014 01:24 IST

प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या स्कूलबसकरिता विशिष्ट नियमावली तयार केली आहे. ही नियमावली सर्व स्कूल बसेसला बंधनकारक करण्यात आली आहे.

व्यवस्थापन समितीचे दुर्लक्ष : क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची ने-आणतेजसिंग सावजी - सावनेरप्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या स्कूलबसकरिता विशिष्ट नियमावली तयार केली आहे. ही नियमावली सर्व स्कूल बसेसला बंधनकारक करण्यात आली आहे. मात्र, सावनेर शहर व परिसरातील बहुतांश स्कूल बसेस ‘आरटीओ’च्या या नियमांची उघडउघड पायमल्ली करीत असल्याचे दिसून येत आहे. सावनेर शहर व परिसरातील काही विद्यार्थी नागपूर -कळमेश्वर मार्गावरील भवन्स, सावनेर- खापा मार्गावरील के. जॉन पब्लिक स्कूल, सेन्ट जॉन कान्व्हेंट यासह अन्य शाळांमध्ये शिक्षण घेतात. सदर विद्यार्थी संबंधित शाळांच्या स्कूल बसेसने नियमित शाळेत जातात व सायंकाळी परत येतात. सावनेर शहरातील विद्यार्थ्यांनी ने-आण करणाऱ्या बहुतांश स्कूल बसेसची सोमवाारी सकाळी प्रत्यक्ष पाहणी केली असता, या बसेसमध्ये क्षमतेच्या दुप्पट विद्यार्थी नेत असल्याचे आढळून आहे. यातील बहुतांश चिमुकले विद्यार्थी हे बसमधील दोन सिटच्या मध्ये असलेल्या जागेत अथवा मार्गात उभे राहतात. चालकाने ऐनवेळी ब्रेक दाबल्यास सदर विद्यार्थ्यांना तोल जाऊन ते खाली कोसळण्याची तथा त्यांना इजा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यातील एका स्कूल बसमध्ये तब्बल ९८ विद्यार्थी असल्याचेही निदर्शनास आले. वास्तवात हा सर्व प्रकार विद्यार्थ्यांच्या पालकांना माहिती आहे. मात्र, शिक्षक संबंधित विद्यार्थ्याला ‘टार्गेट’ करण्याच्या भीतीने या गंभीर प्रकाराविषयी पालक बोलायला तयार नाही. शिवाय, हा प्रकार एका शाळेच्या प्राचार्य जॉबी यांच्यासह वाहतूक पोलिसांच्याही निदर्शनास आणून दिला. सावनेर वेकोलिचे प्रबंधक व प्रबंधन समितीनेही याकडे दुर्लक्ष केले आहे. सावनेर वेकोलि परिसरातून बालाजी ट्रान्सपोर्ट कंपनीच्या काही स्कूल बसेस विद्यार्थ्यांची शाळेत नियमिती ने-आण करतात. यातील एमएच-३१/सीक्यू-५१०२ क्रमांकाच्या बसवर ती कोणत्या शाळेची आहे, याचा उल्लेख करण्यात आला नव्हता. यातील काही बसेसच्या मागच्या भागाला व्यवस्थापन समितीच्या मोबाईल क्रमांकाचा उल्लेख नव्हता. दरम्यान, सावनेर पोलीस ठाण्यातील वाहतूक पोलीस शंकर पाल, सुभाष रुडे, शरद रामटेक आदींनी या सर्व स्कूल बसेसची पाहणी केली आणि बसचालकांना आवश्यक त्या सूचना दिल्या. यात सुधारणा न केल्यास चालकांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची तंबीही या पोलिसांनी दिली.