‘आरटीओ’च्या नियमांची पायमल्ली

By Admin | Updated: July 8, 2014 01:24 IST2014-07-08T01:24:24+5:302014-07-08T01:24:24+5:30

प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या स्कूलबसकरिता विशिष्ट नियमावली तयार केली आहे. ही नियमावली सर्व स्कूल बसेसला बंधनकारक करण्यात आली आहे.

RTI violation rules | ‘आरटीओ’च्या नियमांची पायमल्ली

‘आरटीओ’च्या नियमांची पायमल्ली

व्यवस्थापन समितीचे दुर्लक्ष : क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची ने-आण
तेजसिंग सावजी - सावनेर
प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या स्कूलबसकरिता विशिष्ट नियमावली तयार केली आहे. ही नियमावली सर्व स्कूल बसेसला बंधनकारक करण्यात आली आहे. मात्र, सावनेर शहर व परिसरातील बहुतांश स्कूल बसेस ‘आरटीओ’च्या या नियमांची उघडउघड पायमल्ली करीत असल्याचे दिसून येत आहे.
सावनेर शहर व परिसरातील काही विद्यार्थी नागपूर -कळमेश्वर मार्गावरील भवन्स, सावनेर- खापा मार्गावरील के. जॉन पब्लिक स्कूल, सेन्ट जॉन कान्व्हेंट यासह अन्य शाळांमध्ये शिक्षण घेतात. सदर विद्यार्थी संबंधित शाळांच्या स्कूल बसेसने नियमित शाळेत जातात व सायंकाळी परत येतात. सावनेर शहरातील विद्यार्थ्यांनी ने-आण करणाऱ्या बहुतांश स्कूल बसेसची सोमवाारी सकाळी प्रत्यक्ष पाहणी केली असता, या बसेसमध्ये क्षमतेच्या दुप्पट विद्यार्थी नेत असल्याचे आढळून आहे. यातील बहुतांश चिमुकले विद्यार्थी हे बसमधील दोन सिटच्या मध्ये असलेल्या जागेत अथवा मार्गात उभे राहतात. चालकाने ऐनवेळी ब्रेक दाबल्यास सदर विद्यार्थ्यांना तोल जाऊन ते खाली कोसळण्याची तथा त्यांना इजा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
यातील एका स्कूल बसमध्ये तब्बल ९८ विद्यार्थी असल्याचेही निदर्शनास आले. वास्तवात हा सर्व प्रकार विद्यार्थ्यांच्या पालकांना माहिती आहे. मात्र, शिक्षक संबंधित विद्यार्थ्याला ‘टार्गेट’ करण्याच्या भीतीने या गंभीर प्रकाराविषयी पालक बोलायला तयार नाही. शिवाय, हा प्रकार एका शाळेच्या प्राचार्य जॉबी यांच्यासह वाहतूक पोलिसांच्याही निदर्शनास आणून दिला. सावनेर वेकोलिचे प्रबंधक व प्रबंधन समितीनेही याकडे दुर्लक्ष केले आहे. सावनेर वेकोलि परिसरातून बालाजी ट्रान्सपोर्ट कंपनीच्या काही स्कूल बसेस विद्यार्थ्यांची शाळेत नियमिती ने-आण करतात. यातील एमएच-३१/सीक्यू-५१०२ क्रमांकाच्या बसवर ती कोणत्या शाळेची आहे, याचा उल्लेख करण्यात आला नव्हता. यातील काही बसेसच्या मागच्या भागाला व्यवस्थापन समितीच्या मोबाईल क्रमांकाचा उल्लेख नव्हता. दरम्यान, सावनेर पोलीस ठाण्यातील वाहतूक पोलीस शंकर पाल, सुभाष रुडे, शरद रामटेक आदींनी या सर्व स्कूल बसेसची पाहणी केली आणि बसचालकांना आवश्यक त्या सूचना दिल्या. यात सुधारणा न केल्यास चालकांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची तंबीही या पोलिसांनी दिली.

Web Title: RTI violation rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.