शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

यंदा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आरटीई ऑनलाईन प्रवेशाची सोडत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 1:32 PM

आरटीई २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची लॉटरी प्रक्रियाही यावर्षी हॉलमध्ये आयोजित न करता व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे काढण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देराज्यस्तरावर काढणार पहिली लॉटरीधसका कोरोनाचा

आनंद इंगोले।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कारोना विषाणूच्या प्रादुर्भावाला पायबंद घालण्याकरिता शासनाकडून विविध उपाययोजना राबविल्या जात आहे. नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी विविध कार्यक्रम तसेच शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याच्या शासनाकडून सूचना करण्यात आल्या आहे. अशातच आरटीई २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची लॉटरी प्रक्रियाही यावर्षी हॉलमध्ये आयोजित न करता व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंदर्भात प्राथमिकचे शिक्षण संचालक द. गो. जगताप यांच्या स्वाक्षरीने राज्यातील सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना पत्रही पाठविण्यात आले आहे.बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया २०२०-२०२१ करिता राज्यभरात ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया राबविण्यात आली होती. ११ फेब्रुवारी ते २९ फेब्रुवारीपर्यंत चाललेल्या या ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेत राज्यभरातील ३६ जिल्ह्यांतून २ लाख ९५ हजार २३६ अर्ज प्राप्त झाले आहेत. येत्या मंगळवारी १७ मार्च रोजी सकाळी ११ वाजतापासून दुपारी ४ वाजतापर्यंत लॉटरी प्रक्रिया राबविली जाणार आहे. गेल्यावर्षी ऑनलाईन अर्ज प्राप्त झाल्यानंतर पुण्यातून सर्वांचीच एकाच ठिकाणाहून लॉटरी काढण्यात आली होती. मात्र, यावर्षी कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे लॉटरी प्रक्रिया हॉलमध्ये आयोजित न करता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे काढण्यात येणार आहे. याकरिता राज्यातील जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सला उपस्थित राहावे तसेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता पडताळणी समितीकडे पालकांनी गर्दी करू नये, असेही सूचित करण्याबाबत शिक्षण संचालक (प्राथमिक) यांनी पत्राद्वारे कळविले आहे.राज्यात १ लाख १५ हजार २९८ जागा रिक्तराज्याच्या प्रत्येक जिल्ह्याच्या सर्व माध्यमांच्या विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित (अल्पसंख्याक दर्जाप्राप्त शाळा वगळता) शाळांमध्ये नर्सरी व पहिलीमध्ये वंचित व दुर्बल घटकातील बालकांना २५ टक्के कोट्यांतर्गत मोफत प्रवेश दिला जातो. यामध्ये राज्यभरातील ३६ जिल्ह्यांमधील ९ हजार ३३१ शाळा सहभागी झाल्या आहेत. या सर्व शाळांमध्ये १ लाख १५ हजार २९८ जागा रिक्त असून त्याकरिता २ लाख ९५ हजार २२३ ऑनलाईन तर १३ मोबाईलद्वारे असे एकूण २ लाख ९५ हजार २३६ अर्ज प्राप्त झाले आहेत. रिक्त जागांपेक्षा दुप्पट अर्ज प्राप्त झाल्याने कुणाला संधी मिळते, हे लॉटरीनंतरच कळणार आहे.

पालकांनी मेसेजवर अवलंबून राहू नयेआरटीई २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया २०२०-२०२१ करिता १७ मार्चला लॉटरी काढली जाणार आहे. लॉटरी लागल्याचे किंवा प्रतीक्षा यादीत नाव असल्याचे मेसेज पालकांना १९ मार्चला दुपारनंतर प्राप्त होतील. पण, पालकांनी केवळ मॅसेजवर अवलंबून राहू नये. त्यांनी संकेतस्थळावरील अप्लिकेशनवाईज डिटेल्स यावर क्लिक करून आपला अर्ज क्रमांक टाकून लॉटरी लागली अथवा नाही ते पाहावे, असेही कळविण्यात आले आहे.

टॅग्स :Schoolशाळा