कमलेश वानखेडे, नागपूरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आरएसएस धार्मिक संस्था असून आमचा राजकारणाशी संबंध नाही, असे ते दावे करतात. पण भाजप राजकीय पक्ष असताना त्या पक्षाला मदत करण्यासाठी हे नेहमी समोर येतात. महाकुंभात भाजपने जो इव्हेंट उभा केला, त्यामुळे भाविकांचा मृत्यू झाला. या मृत्यूची जबाबदारी कोण घेणार, आरएसएसने त्यावर खुलासा करावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
नागपुरात शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना पटोले म्हणाले, महाकुंभातील दुर्घटनेवर अद्याप आरएसएसने वक्तव्य का केले नाही. हिंदू रक्षक आरएसएसने प्रश्न विचारला नाही. वास्तिकता पुढे येऊ नये म्हणून मीडियाला तिथे जाण्यास बंदी केली. मृतदेह वाहून देण्यात आले. संतांचे टेंट जळत आहे, काही तरी गडबड तिथे सुरू आहे, अशी शंका त्यांनीव्यक्त केली.
राज ठाकरे यांनी काँग्रेसचीच भूमिका मांडलीकाँग्रेसने निवडणूक आयोगाचा प्रणालीवर भूमिका मांडली. तीच भूमिका राज ठाकरे यांनी मांडली. राज ठाकरे हे पारदर्शकता सांगायचे पण भूमिका ठेवली नव्हती. आयोगाने अद्याप वाढलेल्या ७६ लाख मतांची माहिती दिली नाही. दिवसा ढवळ्या भाजपप्रणित केंद्रीय नेतृत्वाने लोकशाहीचा गळा चिरला आहे, अशी टीका पटोले यांनी केली.
महाराष्ट्र वाऱ्यावर सोडून मुख्यमंत्री दिल्लीत
बीड आणि परभणी येथील गुन्हेगारांना शिक्षा व्हावी. ६५ टक्के मंत्री गुन्हेगार आहेत. एक धनंजय मुंडे नाही तर ६५ टक्के मंत्री यांना राजीनामे द्यावे लागतील. मुख्यमंत्री दिल्लीत प्रचारासाठी जात आहेत. महाराट्राला वाऱ्यावर सोडो जात आहे, अशी टीका पटोले यांनी केली.
धनगेकरांवर साधला नेममाजी आ. रविंद्र धनगेकर यांच्या शिंदेसेनेत प्रवेशाच्या शक्यतेबाबत विचारले असता पटोले म्हणाले, काही लोक राजकारणात व्यवसायिक असतात. ते सत्येसोबत जातात. कोणी काय निर्णय घ्यावा हा त्यांचा विषय आहे.
प्रदेशाध्यक्षांबाबत लवकरच निर्णय
- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष संदर्भात निर्णय लवकरच होईल. या संदर्भात दिल्लीला जाऊन आलो, लवकर निर्णय घ्यावा अशी विनंती केली आहे.
- युवक काँग्रेसमधील वादावर पटोले म्हणाले, युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षची आपली चर्चा झाली आहे. यात दोष नसेल तर कारवाई करू नये असे सांगितले आहे.