तृतीय वर्ष वर्गातील संघ स्वयंसेवकांचे पथसंचलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 21:24 IST2019-06-03T21:24:05+5:302019-06-03T21:24:45+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गातील स्वयंसेवकांनी सोमवारी सायंकाळी पथसंचलन केले. ८२८ स्वयंसेवक या पथसंचलनात सहभागी झाले होते. स्वयंसेवकांचे शिस्तबद्ध पथसंचलन पाहण्यासाठी रेशीमबाग, नंदनवन व सक्करदरा परिसरात नागरिकांची गर्दी झाली होती.

तृतीय वर्ष वर्गातील संघ स्वयंसेवकांचे पथसंचलन
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गातील स्वयंसेवकांनी सोमवारी सायंकाळी पथसंचलन केले. ८२८ स्वयंसेवक या पथसंचलनात सहभागी झाले होते. स्वयंसेवकांचे शिस्तबद्ध पथसंचलन पाहण्यासाठी रेशीमबाग, नंदनवन व सक्करदरा परिसरात नागरिकांची गर्दी झाली होती.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा तृतीय वर्ष शिक्षा वर्ग रेशीमबाग येथे सुरू आहे. २५ दिवस चालणाऱ्या या वर्गामध्ये संपूर्ण भारतातून स्वयंसेवक आलेले आहेत. या स्वयंसेवकांच्या पथसंचलनाला सोमवारी सायंकाळी ६.१५ वाजता रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मारक समिती परिसरातून सुरुवात झाली. त्यानंतर गजानन चौक, संगम टॉकीज, तिरंगा चौक, नंदनवन रोड, जगनाडे चौक, भोला गणेश चौक, सुरेश भट्ट सभागृह, देवांजली बिल्डिंग या मार्गाने पथसंचलन झाले व डॉ. हेडगेवार स्मारक समिती परिसराच्या मैदानावर समापन झाले. संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी, वर्गाचे सर्वाधिकारी अनिरुद्ध देशपांडे, महानगर संघचालक राजेश लोया यांनी शिवनगर बास्केटबॉल मैदान येथे पथसंचलनाचे अवलोकन केले. तृतीय वर्ष शिक्षा वर्गाचा समारोप १६ जून रोजी होणार आहे.