शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
2
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
4
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
5
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
6
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
7
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
8
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
9
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
10
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
11
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
12
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
13
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
14
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल
15
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
16
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
17
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
18
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
19
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
20
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार

इतर देशांची नक्कल मारून भारत आत्मनिर्भर होणार नाही: सरसंघचालक मोहन भागवत 

By योगेश पांडे | Published: December 08, 2022 10:47 PM

जी-२० समुहाचे अध्यक्षपद भारताकडे येणे ही असामान्य बाब

योगेश पांडे - नागपूर, लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : देशाची प्रगती केवळ लोकांची बुद्धिमत्ता किंवा तंत्रज्ञानाच्या आधारावर होत नाही. त्यासाठी समाजाचे भाव व विचारदेखील सकारात्मक असावे लागतात. जगातील इतर देशांकडून चांगले ज्ञान नक्कीच स्वीकार केले पाहिजे. मात्र नवीन भारताचे निर्माण करताना देशाचे मूलतत्व कायम ठेवावे लागेल. इतर देशांची नक्कल मारून भारत आत्मनिर्भर होणार नाही, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी व्यक्त केले. संघाच्या तृतीय वर्ष वर्गाच्या समारोप कार्यक्रमात ते गुरुवारी बोलत होते.

रेशीमबाग मैदानावर आयोजित या कार्यक्रमाला वाराणसी येथील काशी महापीठाचे जगद्गुरू डॉ.मल्लिकार्जून विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. मागील काही वर्षांपासून भारतीयांचा जागतिक पटलावर आत्मविश्वास वाढला आहे. जी २० समुहाचे अध्यक्षपद भारताकडे येणे ही असामान्य बाब आहे. मात्र ही सुरुवात आहे. आणखी बराच मोठा टप्पा गाठायचा आहे. भारताला विश्वगुरू करायचे असेल तर संपूर्ण समाजाला एकत्रित यावे लागेल, असे डॉ.भागवत म्हणाले. यावेळी मंचावर वर्गाचे सर्वाधिकारी दक्षिणामूर्ती विदर्भ प्रांत सहसंघचालक राम हरकरे, महानगर सहसंघचालक श्रीधर गाडगे हे प्रामुख्याने उपस्थित होते. स्वयंसेवकांनी सुरुवातीला दंड, नियुद्ध, योगासन इत्यादींची विविध शारीरिक प्रात्यक्षिके सादर केली. यानंतर घोष प्रात्यक्षिकेही सादर करण्यात आली.

प्रत्येकाने शिस्तीचे पालन करावे

लोकांना व्यक्तिगत व सामाजिक शिस्तीचे पालन करावे लागेल. स्वतंत्र देशात शिस्तीचे पालन हीच देशभक्ती आहे. नागरिकांना हा माझा देश आहे या भावनेतूनच वागावे लागेल, असे डॉ.बाबासाहेब आंबेडकरदेखील म्हणाले होते. संविधान व कायद्याचे पालन करायला हवे, असे डॉ.भागवत यांनी प्रतिपादन केले.

मुलांना लहानपणापासून देशभक्तीचे संस्कार द्या

आधुनिक काळात तरुणांचा व्यवहार बदलला आहे. मुलांवर लहानपणापासूनच देशभक्तीचे संस्कार होणे आवश्यक आहे. जे आईवडीलांची सेवा करू शकत नाहीत, ते देशाची सेवा करू शकणार नाहीत. संस्कारनिर्मितीसाठीच वीरशैव लिंगायत मंच संघासोबत काम करत आहे, असे प्रतिपादन डॉ.मल्लिकार्जून विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामी यांनी केले.

काय म्हणाले सरसंघचालक?

- संघ सर्वांनाच स्वयंसेवक मानतो. काही आज आहेत तर काही भविष्यात होतील.-सृष्टी आमची माता आहे. म्हणूनच पृथ्वी, गाय, नदी या सर्वांना कृतज्ञतेतून आईचा दर्जा दिला आहे.- हिंदू सर्व समाजांना घेऊन चालतो. केवळ एका पुजापद्धतीचे नाव हिंदू नाही. विविधता घेऊन आपण एकत्रितपणे जगू शकतो. जो हे जाणतो तोच हिंदू आहे.-भारताला जगाला जिंकायचे नाही, तर जगाला जोडायचे आहे.- भारताची प्रगती होऊ नये यासाठी प्रयत्न सुरू असतात. भावना भडकावून, दंगे भडकावून स्वतःची पोळी शेकणारे लोक देशातदेखील आहेत.- पंथ, धर्म, जात, भाषा यापेक्षा देशहितालाच महत्त्व द्यावे- सामाजिक समता केवळ बोलण्याने येत नाही, ती सद्भावनेने येते.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघMohan Bhagwatमोहन भागवतnagpurनागपूर