रा.सू. गवई यांची प्रकृती स्थिर

By Admin | Updated: June 27, 2015 03:24 IST2015-06-27T03:24:14+5:302015-06-27T03:24:14+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष व बिहार, केरळचे माजी राज्यपाल रा.सू. गवई यांची ...

R.S. Gavai's condition is stable | रा.सू. गवई यांची प्रकृती स्थिर

रा.सू. गवई यांची प्रकृती स्थिर

मुख्यमंत्र्यांनी दिली भेट
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष व बिहार, केरळचे माजी राज्यपाल रा.सू. गवई यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी रात्री रुग्णालयाला भेट देत त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. याप्रसंगी गवई यांच्या पत्नी कमलताई गवई, त्यांचे चिरंजीव मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती भूषण गवई, राजेंद्र गवई, पीरिपाचे अध्यक्ष आ. जोगेंद्र कवाडे, आ. प्रकाश गजभिये, स्मारक समितीचे सदस्य एन.आर. सुटे, सुधीर फुलझेले, विलास गजघाटे उपस्थित होते. यावेळी रुग्णालयातील डॉक्टरांनी गवई यांची हृदयगती, रक्तदाब स्थिर असल्याची माहिती दिली. सायंकाळी मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे व उपअधिष्ठाता डॉ. अपूर्व पावडे यांनीही भेट देऊन चौकशी केली. नीळू भगत, प्रकाश कुंभे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: R.S. Gavai's condition is stable