शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

१७४ रुपयांसाठी कापली वीज, ग्राहकाला मिळाली ५० हजाराची नुकसानभरपाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 9:22 PM

मोठ्या थकबाकीदारांना सोडून अवघ्या १७४ रुपयांच्या थकीत बिलासाठी एका महिलेचे वीज कनेक्शन बेकायदेशीरपणे खंडित करणाऱ्या एसएनडीएलला ग्राहक कल्याण मंचने फटकारले. इतकेच नव्हे तर पीडित महिला ग्राहकाला झालेला त्रास लक्षात घेता एसएनडीेलला ५० हजार रुपयाची नुकसानभरपाई सुद्धा द्यावी लागली. परंतु यासाठी पीडित महिलेला बराच संघर्षही करावा लागला.

ठळक मुद्देएसएनडीएलला ग्राहक मंचची फटकार : पीडित महिलेच्या संघर्षाला यश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मोठ्या थकबाकीदारांना सोडून अवघ्या १७४ रुपयांच्या थकीत बिलासाठी एका महिलेचे वीज कनेक्शन बेकायदेशीरपणे खंडित करणाऱ्या एसएनडीएलला ग्राहक कल्याण मंचने फटकारले. इतकेच नव्हे तर पीडित महिला ग्राहकाला झालेला त्रास लक्षात घेता एसएनडीेलला ५० हजार रुपयाची नुकसानभरपाई सुद्धा द्यावी लागली. परंतु यासाठी पीडित महिलेला बराच संघर्षही करावा लागला.संगीता गोपीचंद चंद्रिकापुरे असे या महिलेचे नाव आहे. त्या प्लॉट नं. ९२ के.जी.एन सोसायटी सुवर्णनगर पोस्ट उप्पलवाडी येथे राहतात. ४१००१७६१०५७४ हा त्यांचा वीज ग्राहक क्रमांक आहे. हा क्रमांक संगीता यांच्या नावावरच आहे. फेब्रुवारी २०१७ मध्ये त्यांच्या नावावर १७० रुपयाचे थकीत वीज बिल होते. दरम्यानच्या काळात संगीता या चंद्रपूरला असल्याने त्या बिल भरू शकल्या नाही. थकीत वीज बिल भरण्याची शेवटची तारीख १ मार्च २०१७ ही होती. परंतु एसएनडीलच्या अधिकाºयांनी त्यापूर्वीच २७ फेब्रुवारी रोजी कुठलीही पूर्वसूचना न देता चंद्रिकापुरे यांच्या घराचे वीज कनेक्शन विद्युत खांबावरूनच कट केले. तसेच दुसºया एका व्यक्तीच्या नावाने नवीन कनेक्शनही देऊन टाकले. चंद्रिकापुरे यांना याबाबत माहीत होताच त्यांनी विद्युत ग्राहक कल्याण निवारण मंचकडे तक्रार केली. तसेच नुकसानभरपाईची मागणी केली. मंचने त्यांचे म्हणणे मान्य केले. वीज पुरवठा खंडित करण्यासाठी ग्राहकाला पूर्वसूचना देणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करीत १५ दिवसात वीज कनेक्शन पूर्ववत सुरू करण्याचे निर्देश दिले. तसेच ५० हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. एसएनडीएल्या अधिकाºयांनी यात बदमाशी केली. त्यांच्या नुकसानभरपाईची रक्कम एसएनडीएलने वीज बिलाच्या क्रेडिटमध्ये दर्शविली. चंद्रिकापुरे यांच्या लक्षात हा प्रकार आला. त्यांनी पाठपुरावा कायम ठेवला. त्यांनी याबाबत महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या विद्युत लोकपालाकडे तक्रार करीत आपल्याला झालेला आर्थिक, मानसिक त्रास लक्षात घेता नुकसान भरपाईची रक्कम थेट आपल्याला मिळावी, अशी मागणी केली. विद्युत लोकपालाने त्यांची मागणी मान्य करीत एसएनडीएलला तसे निर्देश दिले. या आदेशानुसार एसएनडीएलने गेल्या १८ जुलै रोजी ५० हजार रुपये नुकसानभरपाईचा धनादेश संगीता चंद्रिकापुरे यांना दिला. अशा प्रकारे १७४ रुपयाच्या थकबाकीसाठी केलेली कारवाई एसएनडीएलला ५० हजार रुपयाला पडली.

टॅग्स :mahavitaranमहावितरणnagpurनागपूर