शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
2
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
3
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
4
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
5
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
6
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
7
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
8
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
9
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
10
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
11
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
12
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
13
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
14
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
15
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
16
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
17
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
18
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
19
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
20
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्यांच्या विरोधात आरपीएफने केली दुरसंचारसोबत हातमिळवणी

By नरेश डोंगरे | Updated: April 4, 2025 16:15 IST

मोबाईल चोरीचा झटपट लागेल छडा : सीईआयआर पोर्टल, पायलट प्रोजेक्ट यशस्वी

नरेश डोंगरे - नागपूर लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : प्रवाशांचे मोबाईल चोरून पळ काढणाऱ्या चोरट्यांविरोधात रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) आता जोरदार आघाडी उघडली आहे. आरपीएफने मोबाईल चोरट्यांना जेरबंद करून चोरी गेलेले मोबाईल परत मिळवण्यासाठी दूरसंचार विभागाशी हातमिळवणी (करार) केली आहे. त्यामुळे प्रवाशांचे चोरी गेलेले मोबाईल लवकर परत मिळवणे सोपे होणार आहे.

रेल्वे स्थानक अथवा विविध रेल्वे गाड्यांमधील गाफिल प्रवाशाचे मोबाईल लंपास करून चोरटे पळून जातात. या चोरीची तक्रार दाखल होईपर्यंत चोरटे कुठल्या कुठे निघून जातात. त्यामुळे चोरी गेलेला मोबाईल परत मिळवणे कठीण होते. मात्र, आता आरपीएफने दूरसंचार विभागाच्या सीईआयआर पोर्टलची साथ मिळवून चोरीला गेलेले मोबाईल परत मिळवण्यासाठी जोरदार आघाडी उघडली आहे.

विशेष म्हणजे, आरपीएफने नॉर्थ ईस्ट फ्रंटीयर रेल्वेत अशा प्रकारचा एक पायलट प्रोजेक्ट मे २०२४ मध्ये सुरू केला होता. त्याला अपेक्षेपेक्षा चांगले यश मिळाले. चोरी गेलेले हजारो फोन आरपीएफच्या हाती लागले. हे फोन लंपास करणारे चोरटेही मिळाले. त्यामुळे आरपीएफने आता हा प्रयोग देशभर सुरू करण्याचे ठरवले आहे.

काय आहे सीईआयआर ?दूरसंचार विभागाचे हे पोर्टल एक डिजिटल प्लेटफार्म आहे. चोरीला गेलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू ब्लॉक करण्याची, ट्रॅक करण्याची आणि प्रतिबंधित करण्याची सुविधा यातून मिळते. त्यामुळे आता रेल्वे प्रवाशांचे चोरी गेलेले किंवा गहाळ झालेले मोबाईल आधी शोधण्याचा प्रयत्न केला जाईल. ते मिळत नसल्यास मोबाईलचा आयएमईआय नंबर ब्लॉक केला जाईल. अर्थात तो मोबाईल चोरटा किंवा दुसरा कुणी व्यक्ती वापरू शकणार नाही. दुसरीकडे मोबाईल धारक वारंवार प्रयत्न करेल आणि ट्रेकिंगच्या माध्यमातून हा मोबाईल परत मिळवणे सहज शक्य होईल.

नवीन सीम टाकून मोबाईल सुरू केला तर...चोरीला गेलेला मोबाईल परत मिळवण्यासाठी प्रवासी मोबाईलची तक्रार रेल मदत या पोर्टलवर किंवा रेल्वे हेल्पलाईन नंबर १३९ वर करू शकतात. त्यांना एफआयआर दाखल करण्याची ईच्छा नसेल तर ते सीईआयआर पोर्टवरही तक्रार देऊ शकतात. येथे नोंदणी झाल्यानंतर आरपीएफच्या झोनल सायबर सेलमध्ये ती तक्रार नोंदली जाईल. त्यानंतर आवश्यक विवरण नोंदवून घेतल्यानंतर मोबाईलचे सीम ब्लॉक केले जाईल. चोरटा किंवा त्याच्या साथीदाराने नवीन सीम टाकून मोबाईल सुरू केला तर संबंधित व्यक्तीला आरपीएफकडून फोन करून तो मोबाईल तात्काळ जवळच्या आरपीएफ चाैकीत जमा करण्याचे आदेश दिले जातील. त्याने प्रतिसाद दिला नाही तर गुन्हा दाखल केला जाईल.

टॅग्स :railwayरेल्वेnagpurनागपूर