शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

Nagpur: अहमदाबाद एक्सप्रेसमध्ये आरपीएफने केले ऑपरेशन नार्कोस, बिहारचा गांजा तस्कर जेरबंद

By नरेश डोंगरे | Updated: March 23, 2024 21:19 IST

Nagpur News: रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) ट्रेन नंबर २०८६१ पुरी-अहमदाबाद एक्सप्रेसमध्ये 'ऑपरेशन नार्कोस' राबवून १० किलो गांजा जप्त केला. या प्रकरणी गांजाची तस्करी करणाऱ्या बिहारमधील एका आरोपीलाही आरपीएफने ताब्यात घेतले.

- नरेश डोंगरे नागपूर - रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) ट्रेन नंबर २०८६१ पुरी-अहमदाबाद एक्सप्रेसमध्ये 'ऑपरेशन नार्कोस' राबवून १० किलो गांजा जप्त केला. या प्रकरणी गांजाची तस्करी करणाऱ्या बिहारमधील एका आरोपीलाही आरपीएफने ताब्यात घेतले. राजेशकुमार कृष्णदेव मंडल (वय ३६) असे अटकेतील गांजा तस्कराचे नाव असून तो भागलपूर (बिहार) जिल्ह्यातील नारायणपूरचा रहिवासी आहे.

सुरक्षा आयुक्त दीपचंद्र आर्य यांच्या मार्गदर्शनाखाली आरपीएफचे पथक पूरी-अहमदाबाद एक्सप्रेसमध्ये ऑपरेशन नार्कोस अंतर्गत झाडाझडती घेत होते. ही गाडी शुक्रवारी भंडारा स्थानकावरून नागपूरकडे निघाल्यानंतर जनरल डब्यात एक व्यक्ती संशयास्पद वर्तन करीत असल्याचे आरपीएफच्या जवानांना जाणवले. त्यामुळे आरपीएफने त्याच्या सीटखाली तपासणी केली असता दोन बॅग आढळल्या. त्या बाहेर काढल्या असता बॅगमधून उग्र दर्प आला. त्यामुळे आरपीएफच्या पथकाने पंचासमक्ष त्या उघडल्या असता त्यात गांजाचे पॅकेट आढळले. आरोपी राजेश या गांजाचे पार्सल असलेल्या बॅग घेऊन पूरी येथून रेल्वेत बसला होता. तो जळगावला जाणार असल्याचे त्याच्या जवळ आढळलेल्या तिकिटमधून स्पष्ट झाले. त्यामुळे नागपूरच्या नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी रेल्वे स्थानकावर गाडी येताच आरोपीला खाली उतरवून त्याची कसून चाैकशी करण्यात आली. तो गांजाची खेप जळगावला पोहचवणार होता, हे स्पष्ट होताच शुक्रवारी सायंकाळी त्याला रेल्वे पोलिसांच्या हवाली करण्यात आले. कागदोपत्री कारवाई करून आरोपी राजेश मंडलला रेल्वे पोलिसांनी शनिवारी रात्री अटक केली.

आरपीएफचे सुरक्षा आयुक्त दीपचंद्र आर्य यांच्या मार्गदर्शनाखाली पीआय एस. ए. राव, एएसआय अजय चाैबे, के. के. निकोड, कर्मचारी जी. आर. मडावी, व्ही. एस. पटले, डी. एन. यादव तसेच सुधाकर बोरकर यांनी ही कारवाई केली. लोकमतच्या वृत्तावर शिक्कामोर्तबविशेष म्हणजे, लोकमतने शनिवारच्या अंकात रेल्वेतून गांजा, दारू, भांगेसह अंमली पदार्थाची मोठी तस्करी होत असल्याचे वृत्त ठळकपणे प्रकाशित केले. या कारवाईमुळे पुन्हा एकदा लोकमतच्या वृत्तावर शिक्कामोर्तब झाले आहे. दरम्यान, जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत २,०४,३२० रुपये आहे. अशा प्रकारे कुणी अंमली पदार्थांची वाहतूक करीत असेल तर तातडीने आरपीएफ किंवा जीआरपीला किंवा हेल्पलाइन नंबर १३९ वर कॉल करून माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :nagpurनागपूरCrime Newsगुन्हेगारी