रोईंगपटू ज्योतीने सायकलिंगमध्येही मिळविले नावलौकिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2022 18:35 IST2022-03-30T16:16:15+5:302022-03-30T18:35:20+5:30
२०१९ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत ज्योती ही पॅरा रोईंगमधील कांस्य विजेती आहे. तर, सायकलिंगमध्ये पहिल्याच प्रयत्नांत तिने सुवर्णमय कामगिरी केली.

रोईंगपटू ज्योतीने सायकलिंगमध्येही मिळविले नावलौकिक
नीलेश देशपांडे
नागपूर : ज्योती गडेरिया. भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील डोंगरगावची रोईंग खेळाडू. देशाचे प्रतिनिधित्व करीत तिने आशिाई रोड आणि पॅरासायकलिंग स्पर्धेत तिने सुवर्ण जिंकले. ताजिकिस्तानमध्ये झालेल्या या स्पर्धेतील कामगिरीद्वारे ज्योतीने ‘इच्छा तिथे मार्ग’ही म्हण सार्थ ठरविली आहे.
विशेष म्हणजे २०१९ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत ज्योती ही पॅरा रोईंगमधील कांस्य विजेती आहे. सायकलिंगमध्ये पहिल्याच प्रयत्नांत तिने सुवर्णमय कामगिरी केली. ताजिकिस्तानमधील स्वत:चे अनुभव सांगताना ती म्हणाली,‘पहिल्या प्रयत्नात सुवर्ण जिंकल्याचा आनंद अलौकीक ठरला. जाण्याआधी मी नेतेमंडळी आणि समाजाकडून काही अपेक्षा बाळगल्या होत्या, पण कुणीही पुढ आले नाही. अखेर आदित्य मेहता फाऊंडेशनने मदतीचा हात दिला. त्यांच्या सहकार्यामुळेच देशासाठी पदक जिंकणे शक्य झाले.’
हैदराबाद येथील चाचणीद्वारे ज्योतीची निवड झाली होती. तिने सुवर्णमय प्रवासात १५ कमी अंतर ३२ मिनिटात गाठले. आता विश्व चॅम्पियनशिपवर लक्ष्य केंद्रित करणार. याशिवाय पॅरालिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकण्याचेअआणि एव्हरेस्ट सर करण्याचे लक्ष्य आहे.’
खरेतर ज्योतीला आशियाई रोईंग स्पर्धा आणि आशियाई क्रीडा स्पर्धेची तयारी करायाची होती, पण त्यासाठी लागणाऱ्या साहित्याची जुळवाजुळव करण्यासाठी आर्थिक सहकार्य मिळ शकले नाही. त्यामुळे निराश झालेली ज्योती अखेर सायकलिंगकडे वळली. २०१६ ला झालेल्या रस्ता अपघातात ती जखमी झाल्याने पाय गमवावा लागला. पण तिने कधीही आशा सोडली नाही. धैर्याने आणि दृढनिश्चयाने सामान्य आयुष्य जगण्याचे ठरवले. खेळाडू म्हणून पालकांना आणि देशाला अभिमान वाटावा अशी कामगिरी केली आहे.