शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
7
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
8
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
9
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
10
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
11
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
12
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
13
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
14
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
15
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
16
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
17
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
18
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
19
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
20
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार

‘रोमिओ’ झाला हिंसक, विनयभंग करत विद्यार्थिनीला जीवे मारण्याची धमकी

By योगेश पांडे | Updated: April 11, 2023 16:27 IST

आईच्या सतर्कतेमुळे आरोपी अटकेत

नागपूर : मैत्री असताना त्याला प्रेमप्रकरणात बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्या रोडरोमियोला विद्यार्थिनीने भाव न दिल्याने तो हिंसक झाला व त्याने तिच्या घरी जाऊन तमाशा केला. इतक्यावर तो थांबला नाही तर तिचा विनयभंग करत तिला जीवे मारण्याची धमकी दिली. तिच्या आईने योग्य वेळी सतर्कता दाखवत पोलिसांना फोन लावल्याने मुलीवर हल्ला करण्याचे मनसुब्यांवर पाणी फेरल्या गेले. एखाद्या चित्रपटाला शोभेल असा प्रकार राणाप्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

संजू गिरीजाशंकर तिवारी (१८, शताब्दी चौक, रामेश्वरी) असे आरोपीचे नाव आहे. प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका महाविद्यालयीन तरुणीशी त्याची ओळखी होती. तो लहानपणी तिच्याच घराजवळ राहत होता. ओळखीतून त्याने तिच्याशी बोलणे सुरू केले व दोघांमध्ये मैत्री झाली. मात्र एका वर्षाअगोदर संजुमध्ये प्रेमाचे भूत शिरले व त्याने तिला प्रपोझ केले.

विद्यार्थिनीने त्याला नकार दिला. मात्र त्याने तिचा पिच्छा सुरूच ठेवला व महाविद्यालयात येता जाता तिचा तो पाठलाग करायचा. संबंधित विद्यार्थिनी व तिच्या आईने त्याला हटकले होते, तसेच त्याच्या आईलादेखील त्याच्या वागण्याची कल्पना दिली होती. मात्र त्याच्यावर कसलाच फरक पडला नाही. तो तिला त्रास देत धमकी द्यायचा.

सोमवारी रात्री साडेनऊच्या जवळपास तो तिच्या घरासमोर आला व त्याने अश्लील भाषेत बोलण्यास सुरुवात केली. त्याने तिला सर्वांदेखत जीवे ठार मारण्याचीदेखील धमकी दिली. तिच्या आईने लगेच पोलिसांना फोन केला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांचे पथक लगेच घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी तो तेथेच होता. पोलिसांना पाहून त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला स्थानिक रहिवाशांच्या मदतीने पोलिसांनी पकडले. त्याच्या खिशातून चाकू जप्त करण्यात आला. विद्यार्थिनीच्या आईने केलेल्या तक्रारीवरून आरोपी संजुविरोधात गुन्हा नोंदवत त्याला अटक करण्यात आली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूरMolestationविनयभंग