मनातील उत्कट प्रेम प्रकट करणारा राेमँटिक डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:10 IST2021-02-13T04:10:46+5:302021-02-13T04:10:46+5:30
नागपूर : गुलाब देऊन प्रपाेज करण्याने व्हॅलेन्टाईन सप्ताह सुरू हाेताे. त्यानंतर हळूहळू नात्याची वीण घट्ट करत १४ फेब्रुवारीला व्हॅलेन्टाईन ...

मनातील उत्कट प्रेम प्रकट करणारा राेमँटिक डे
नागपूर : गुलाब देऊन प्रपाेज करण्याने व्हॅलेन्टाईन सप्ताह सुरू हाेताे. त्यानंतर हळूहळू नात्याची वीण घट्ट करत १४ फेब्रुवारीला व्हॅलेन्टाईन दिनाच्या दिवशी प्रेमाच्या अभिव्यक्तीला पूर्णत्व येते. पण त्यापूर्वी १३ फेब्रुवारीला येताे ताे खास दिवस म्हणजे चुंबन दिन किंवा किस डे. प्रेमाचा टप्पा यशस्वीपणे पार केला की या दिवशी आपल्या पार्टनरचे भावनिक चुंबन घेऊन मनातील उत्कट प्रेम व्यक्त केले जाते आणि अखंडित प्रेमाची कबुली दिली जाते.
फेब्रुवारी महिना सुरू झाला की सर्वत्र प्रेमाचा सुगंध पसरलेला असतो आणि संपूर्ण जग आपल्या आवडत्या व्यक्तीसमोर आपले प्रेम व्यक्त करण्याच्या तयारीत असते. तसे व्हॅलेन्टाइन विकमधले सर्वच दिवस खास भावना दर्शविणारे असतात. त्यातलाच हाही महत्त्वाचा दिवस म्हणता येईल. सात दिवस खास पद्धतीने साजरे हाेतात तसा हाही दिवस हाेताे. काहींच्या मते किस हा नात्यात अश्लीलता निर्माण करण्याची पहिली पायरी आहे. मात्र काहींच्या मते हा दिन मनातील उत्कटता आणि सत्यता व्यक्त करणारा क्षण आहे.
तसे किस किंवा चुंबन प्रेमी युगुलांसाठीच महत्त्वाचे आहे असे नाही. कधी फक्त प्रेम दर्शवण्यासाठी केले जाते, कधी शुभेच्छा देण्यासाठी तर कधी निरोप घेतानासुद्धा चुंबन दिले घेतले जाते. मातापित्याने आपल्या बाळाच्या घेतलेल्या चुंबनासारखे अमूल्य काहीच नाही. एखाद्या खेळातील विजयी खेळाडू जिंकलेल्या ट्राॅफीचे चुंबन घेताे, ताे असीम अभिमानाचा क्षण असताे. मित्राला, सहकाऱ्यांना, भाऊ-बहीण किंवा आईवडिलांनाही प्रेम दर्शविण्यासाठी चुंबनाचीच मदत घेतली जाते. घरातील पाळलेल्या प्राण्याला, मात्र व्हॅलेन्टाइन पर्वात चुंबन म्हटले की लव्ह बर्ड्सच्या क्रिया-प्रतिक्रियेलाच लक्षात ठेवले जात असल्याने अशा भावनिक क्षणांकडे दुर्लक्ष केले जाते. ते काहीही असले तरी किस किंवा चुंबन म्हणजे राेमांसचा परमाेच्च बिंदू म्हणायला हरकत नाही. सध्या काेराेनामुळे राेमांसला मर्यादा आल्या आहेत. पण या भावना ऑनलाईन व्यक्त करण्याचे पर्याय आहेत. आपल्या प्रियकराला राेमाँटिक शायरी, इमेज, संदेश पाठवूनही या दिवसाचा आनंद घेतला जाऊ शकताे.