शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

संविधानामध्ये बाबासाहेबांची भूमिका व्यापक : अशोक गोडघाटे

By admin | Updated: June 20, 2016 02:53 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ब्राह्मणांच्या नव्हे तर ब्राह्मण्याच्या विरोधात होते. त्यांना समाजात समता प्रस्थापित करायची होती.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ब्राह्मणांच्या नव्हे तर ब्राह्मण्याच्या विरोधात होते. त्यांना समाजात समता प्रस्थापित करायची होती. त्यासाठी त्यांनी देशभरात चळवळ उभी केली. बाबासाहेबांची ही व्यापक भूमिका भारतीय संविधानामध्येसुद्धा आलेली आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्रा. अशोक गोडघाटे यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार संमेलनाच्या पहिल्या सत्रातील अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. याच सत्रात धम्मसंगिनी रमागोमुख, प्रा. दिलीप चव्हाण आणि चैत्रा रेडेकर यांचा सहभाग होता. महात्मा फुले यांनी उभी केलेली चळवळ बाबासाहेबांनी संपूर्ण देशभरात पसरवली असेही गोडघाटे यांनी स्पष्ट केले. चैत्रा रेडेकर यांनी राज्यघटनेचे तत्त्वज्ञान आणि घटनात्मक नैतिकता या विषयावर मार्गदर्शन करतांना सांगितले की, संविधानाच्या प्रास्ताविकेवर एका ओळीचे विश्लेषण करून राजकारणी मोकळे होतात. हा जणू पायंडाच पडला आहे. राज्यघटनेचे तत्त्वज्ञान इतके व्यापक आहे की, ते समजून घेण्याची गरज आहे. एक व्यक्ती एक मत इतक्यावरच आपले अधिकार थांबले होते. संविधानाने त्यात अधिकची भर घालून ती जागतिक पातळीवर नेली आहे. यावेळी धम्मसंगिनी रमगोमुख यांनी बाबासाहेबांच्या धर्म, धम्म व स्त्रीविषयक विचारांवर प्रकाश टाकला तर दिलीप चव्हाण यांनी आंबेडकरांची राष्ट्र संकल्पना आणि जातिविहीन वर्गविहीन समाजरचना यावर प्रकाश टाकला.