संविधानामध्ये बाबासाहेबांची भूमिका व्यापक : अशोक गोडघाटे
By Admin | Updated: June 20, 2016 02:53 IST2016-06-20T02:53:26+5:302016-06-20T02:53:26+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ब्राह्मणांच्या नव्हे तर ब्राह्मण्याच्या विरोधात होते. त्यांना समाजात समता प्रस्थापित करायची होती.

संविधानामध्ये बाबासाहेबांची भूमिका व्यापक : अशोक गोडघाटे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ब्राह्मणांच्या नव्हे तर ब्राह्मण्याच्या विरोधात होते. त्यांना समाजात समता प्रस्थापित करायची होती. त्यासाठी त्यांनी देशभरात चळवळ उभी केली. बाबासाहेबांची ही व्यापक भूमिका भारतीय संविधानामध्येसुद्धा आलेली आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्रा. अशोक गोडघाटे यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार संमेलनाच्या पहिल्या सत्रातील अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. याच सत्रात धम्मसंगिनी रमागोमुख, प्रा. दिलीप चव्हाण आणि चैत्रा रेडेकर यांचा सहभाग होता. महात्मा फुले यांनी उभी केलेली चळवळ बाबासाहेबांनी संपूर्ण देशभरात पसरवली असेही गोडघाटे यांनी स्पष्ट केले. चैत्रा रेडेकर यांनी राज्यघटनेचे तत्त्वज्ञान आणि घटनात्मक नैतिकता या विषयावर मार्गदर्शन करतांना सांगितले की, संविधानाच्या प्रास्ताविकेवर एका ओळीचे विश्लेषण करून राजकारणी मोकळे होतात. हा जणू पायंडाच पडला आहे. राज्यघटनेचे तत्त्वज्ञान इतके व्यापक आहे की, ते समजून घेण्याची गरज आहे. एक व्यक्ती एक मत इतक्यावरच आपले अधिकार थांबले होते. संविधानाने त्यात अधिकची भर घालून ती जागतिक पातळीवर नेली आहे. यावेळी धम्मसंगिनी रमगोमुख यांनी बाबासाहेबांच्या धर्म, धम्म व स्त्रीविषयक विचारांवर प्रकाश टाकला तर दिलीप चव्हाण यांनी आंबेडकरांची राष्ट्र संकल्पना आणि जातिविहीन वर्गविहीन समाजरचना यावर प्रकाश टाकला.