शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील धरणांनाही धोका : जिल्हाधिकाऱ्यांनी दिले ‘स्ट्रक्चरल ऑडिट’चे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 22:20 IST

तिवरे धरणाप्रमाणे अतिवृष्टीमुळे नागपुरातील धरणांनाही धोका होण्याची शक्यता लक्षात घेता जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी नागपुरातील लहान, मोठे मध्यम असे सर्व प्रकल्प, धरण, तलाव व इतर जलसाठ्यांच्या संरचनात्मक तपासणी (स्ट्रक्चरल ऑडिट) करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच आवश्यक दुरुस्ती करून सर्व प्रकल्पाच्या दर्जाबाबतची सद्यस्थिती अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

ठळक मुद्देआवश्यक दुरुस्ती करण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तिवरे धरणाप्रमाणे अतिवृष्टीमुळे नागपुरातील धरणांनाही धोका होण्याची शक्यता लक्षात घेता जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी नागपुरातील लहान, मोठे मध्यम असे सर्व प्रकल्प, धरण, तलाव व इतर जलसाठ्यांच्या संरचनात्मक तपासणी (स्ट्रक्चरल ऑडिट) करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच आवश्यक दुरुस्ती करून सर्व प्रकल्पाच्या दर्जाबाबतची सद्यस्थिती अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.नुकत्याच झालेल्या पावसात रत्नागिरी ता. चिपळून येथील तिवरे धरण फुटले . या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष अश्विन मुदगल यांनी गेल्या मान्सूनपूर्व आढावा बैठकीत झालेली चर्चा आणि विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता व विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, मोठे पाटबंधारे प्रकल्प, मध्यम पाटबंधारे प्रकल्प, लघु पाटबंधारे प्रकल्पांच्या कार्यकारी अधिकारी आदी सर्वांनाच तातडीने पत्र पाठवून तलाव व धरणांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनी आपल्या आदेशात स्पष्टपणे म्हटले आहे की, मान्सून कालावधीत अतिवृष्टीमुळे जलसिंचन प्रकल्प (मोठे, मध्यम व लघु) यांना धोका असण्याची शक्यता तसेच प्रकल्पांचे बांध व भिंतीला तडा जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशी घटना घडल्यास जीवित व वित्त हानी मोठ्या प्रमाणावर होत असते. या अनुषंगाने नागपूर जिल्ह्यातील विविध पाटबंधारे प्रकल्पांची सुस्थितीची निश्चिती करून घेणे आवश्यक आहे. तेव्हा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ३० (२)(५), ३० (२) (११), ४१(२) नुसार जिल्ह्यातील आपल्या कार्यक्षेत्राच्या अधिनस्थ असलेले जलसिंचन, पाटबंधारे प्रकल्प (मोठे,मध्यम व लघु) धरण, तलाव व इतर जलसाठ्यांची संरचनात्मक तपासणी करावी. तसेच आवश्यक दुरुस्ती व कार्यवाही करून त्यांची सुस्थिती निश्चित करावी व तसा अनुपालन अहवाल तात्काळ सादर करावा. तसेच सर्व प्रकल्पाच्या दर्जाबाबतची सद्यस्थिती अहवाल सुद्धा सादर करावा, असे आदेश दिले आहेत.

 

टॅग्स :Damधरणcollectorजिल्हाधिकारीnagpurनागपूर