काचूरवाही येथे आढावा बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:39 IST2021-02-05T04:39:37+5:302021-02-05T04:39:37+5:30

रामटेक : काचूरवाही (ता. रामटेक) येथील ग्रामपंचायत कार्यालयात बुधवारी (दि. २७) आढावा बैठकीचे आयाेजन करण्यात आले हाेते. त्यात जिल्हा ...

Review meeting at Kachurwahi | काचूरवाही येथे आढावा बैठक

काचूरवाही येथे आढावा बैठक

रामटेक : काचूरवाही (ता. रामटेक) येथील ग्रामपंचायत कार्यालयात बुधवारी (दि. २७) आढावा बैठकीचे आयाेजन करण्यात आले हाेते. त्यात जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे, जिल्हा परिषद सदस्य दुधराम सव्वालाखे यांनी गावातील विविध विकास कामांचा आढावा घेत स्थानिक नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.

याप्रसंगी माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांच्या हस्ते रामटेक तालुक्यातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा गाैरव करण्यात आला. यात पंचायत समिती सदस्य भूषण होलगिरे, काचूरवाहीचे सरपंच शैलेश राऊत, किरणापूर, शिवनी, भोडकी, चोखाळा येथील रामेश्वर हटवार, अशोक कडबे, सविता हटवार, लक्ष्मी डोंगरे, इंदिरा हटवार, काचूरवाहीचे सैनिक सुशील वाडीभस्मे यांचा समावेश हाेता. बैठकीला खंडविकास अधिकारी प्रवीण ब्रम्हनोटे, सरपंच प्रशांत कामडी, उपसरपंच कल्पना नाटकर, श्रीकांत बावनकुळे, नरेंद्र बावनकुळे, ग्रामविकास अधिकारी समाधान वानखेडे, एस. कामळे, राजश्री साकोरे, सुलोचना मोहनकार यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित हाेते.

Web Title: Review meeting at Kachurwahi