शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
4
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
5
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
6
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
7
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
8
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
9
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
10
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
11
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
12
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
13
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
14
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
15
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
17
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
18
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
19
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
20
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
Daily Top 2Weekly Top 5

गुंतवणूकदारांना सात दिवसात ठेवी परत करा

By admin | Updated: February 20, 2015 02:15 IST

जोशी हा नागपूर मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त असल्याने हा आदेश त्याला बजावण्याच्या संदर्भात सरकार पक्षाने एमपीआयडी कायद्याचे विशेष न्यायाधीश व्ही. टी. सूर्यवंशी यांच्या न्यायालयात अर्ज केला होता.

जोशी हा नागपूर मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त असल्याने हा आदेश त्याला बजावण्याच्या संदर्भात सरकार पक्षाने एमपीआयडी कायद्याचे विशेष न्यायाधीश व्ही. टी. सूर्यवंशी यांच्या न्यायालयात अर्ज केला होता. त्यावर न्यायालयाने आदेश बजावण्याची कामगिरी आर्थिक गुन्हे पथकाकडे सोपवली होती. सोमवारी तपास अधिकारी विष्णू भोये यांनी कारागृहात समीर जोशी याला हा आदेश दिला. न्यायालयात गुंतवणूकदारांचे वकील अ‍ॅड. बी. एम. करडे उपस्थित होते. समीर जोशी याने ठेवी गोळा करून नये, गुंतवणूक संदर्भातील जाहिरातीचे साहित्य काढून घ्यावे, असेही या आदेशात नमूद आहे. समीर जोशी बीएसई आणि एनएसईचा सब ब्रोकर होता. स्टॉक ब्रोकर मेसर्स किसन रतिलाल चोकसे शेअर्स अँड सेक्युरिटीज प्रा. लि. सोबतही संलग्न होता. त्याने १५ ते २८ महिन्यात दाम दुप्पटचे आमिष दाखवून ५००० कोटी रुपये ६००० गुंतवणूकदारांकडून गोळा केले. व्याज आणि मुद्दल गुंतवणूदारांना परत केले नाही, अशा तक्रारी सेबीला प्राप्त झाल्या होत्या. त्यावर सेबीने तपास केला होता. सेबीच्या तपासात समीर जोशी याने श्रीसूर्या या नावाने सॉफ्ट ड्रिंक्स, इन्फ्रा प्रोजेक्ट, डेअरी अँड फार्म, कॅफे रिटेल, आॅईल अँड एक्सट्रॅक्शनस्, मीडिया नेटवर्क, इन टेक, वेल्थ रिस्क अ‍ॅडव्हाझरी, सुपर मार्केट आणि ड्रिम डेस्टिनेशनस्, अशा दहा कंपन्या सुरू केल्या होत्या. त्यापैकी इन टेक या कंपनीत समीर जोशी आणि मनोज तत्त्ववादी तर उर्वरित ९ कंपन्यांमध्ये समीर जोशी आणि त्याची पत्नी पल्लवी जोशी हे सर्वेसर्वा होते. श्रीसूर्याने ३१ मार्च २०१० पर्यंत ९३४ गुंतवणूकदारांकडून २१ कोटी ३० लाख, २०११ पर्यंत १७६२ गुंतवणूकदारांकडून ४२ कोटी २ लाख आणि २०१२ पर्यंत १९३० गुंतवणूकदारांकडून ५६ कोटी ७३ लाखांच्या ठेवी गोळा केल्या होत्या. समीर जोशी याला या आदेशावर २१ दिवसात आक्षेप दाखल करण्याची संधीही सेबीने दिली आहे. सेबीचे पूर्ण वेळ सदस्य राजीवकुमार अग्रवाल यांनी हा आदेश २० जानेवारी रोजीच जारी केला होता. हा आदेश सोमवारी बजावण्यात आला. (प्रतिनिधी)