शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
4
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
5
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
6
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
7
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
8
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
9
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
10
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
11
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
12
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
13
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
14
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
15
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
16
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
17
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
18
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
19
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
20
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
Daily Top 2Weekly Top 5

युग चांडक खून खटल्याचा निकाल आज

By admin | Updated: January 28, 2016 03:03 IST

बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित लकडगंज भागातील गुरुवंदना सोसायटी येथील आठ वर्षीय युग चांडक अपहरण-हत्याकांड खटल्याचा निकाल प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर सोनवणे ...

नागपूर : बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित लकडगंज भागातील गुरुवंदना सोसायटी येथील आठ वर्षीय युग चांडक अपहरण-हत्याकांड खटल्याचा निकाल प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर सोनवणे यांचे न्यायालय उद्या गुरुवारी जाहीर करणार आहे. या निकालाकडे शहरवासीयांचे लक्ष लागलेले आहे.न्यायालयाने १४ जानेवारी रोजी निकालाची तारीख २८ जानेवारी निश्चित केली होती, परंतु उद्या निकालाची शक्यता कमी असल्याचे बोलले जात आहे. राजेश धनालाल दवारे (२०) रा. वांजरी ले-आऊट कळमना, अरविंद अभिलाष सिंग (२४) रा. प्रीती ले-आऊट, नारा रोड जरीपटका, अशी आरोपींची नावे आहेत. दोसरभवन चौकातील प्रसिद्ध दंतचिकित्सक डॉ. मुकेश चांडक यांचा सेंटर पॉर्इंट शाळेत चौथ्या वर्गात शिकणारा मुलगा युग याचे कामावरून काढलेला क्लिनिकचा नोकर राजेश दवारे आणि त्याचा मित्र अरविंद सिंग यांनी १ सप्टेंबर २०१४ रोजी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास अपहरण केले होते. युग शाळेतून बसने घरी परतताच ही घटना घडली होती. अपहरणकर्त्यांनी दहेगाव-पाटणसावंगी दरम्यानच्या लोणखैरी येथील नाल्यात त्याचा निर्घृण खून केला होता. २ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास आरोपींच्या कबुलीवरून युगचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला होता. मृतदेह नाल्यात रेती व पालापाचोळ्याने झाकलेला होता आणि डोक्यावर मोठा दगड ठेवलेला होता. युगचा मृत्यू गुदमरून झाल्याचा वैद्यकीय अधिकाऱ्याचा अभिप्राय होता. मृतदेहावर २६ जखमा होत्या. त्यापैकी २२ जखमा मृत्युपूर्वीच्या आणि ४ मृत्यूनंतरच्या होत्या. शवविच्छेदन ३ सप्टेंबर रोजी मेयो इस्पितळात करण्यात आले होते.खंडणीसाठी दोन वेळा फोननागपूर : आरोपींकडून दोनवेळा खंडणीसाठी फोन करण्यात आले होते. पहिला फोन १ सप्टेंबर २०१४ रोजी रात्री ८.१७ वाजता डॉ. मुकेश चांडक यांना करण्यात आला होता. फोन करणाऱ्याने स्वत:चे नाव मोहसीन खान असल्याचे सांगितले होते. त्याने १० कोटी रुपयांची मागणी केली होती. लागलीच रात्री ८.३८ वाजता दुसरा फोन आला होता. ‘युग हमारे कब्जे मे है, पाच करोड लेकर आओ, कल शाम ३ बजे बम्बई मे पैसे लेकर आना’, असे अपहरणकर्ता म्हणाला होता. हवेत स्वप्नांचे मनोरे चढवीत अपहरणकर्त्यांनी खंडणीसाठी युगचा भयावह अंत केला होता. लकडगंज पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यनारायण जयस्वाल यांनी या प्रकरणाचा तपास करून आरोपींविरुद्ध २९० पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. खटल्याच्या सुनावणीस १९ जानेवारी २०१५ पासून प्रारंभ झाला होता. पहिल्याच दिवशी डॉ. मुकेश चांडक यांची पहिली साक्ष तपासण्यात आली होती. आतापर्यंत सरकार पक्षाने ५० आणि बचाव पक्षाने ७ साक्षीदार तपासले आहेत. न्यायालयात सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील ज्योती वजानी, फिर्यादी डॉ. मुकेश चांडक यांच्यावतीने अ‍ॅड. राजेंद्र डागा, त्यांचे सहकारी अ‍ॅड. मनोज दुल्लरवार, लिगल एडमार्फत मिळालेले आरोपी राजेश दवारे याच्यावतीने अ‍ॅड. प्रदीप अग्रवाल, अ‍ॅड. राजेश्री वासनिक, दुसरा आरोपी अरविंद सिंग याच्या वतीने अ‍ॅड. मनमोहन उपाध्याय आणि अ‍ॅड. प्रमोद उपाध्याय यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)