सफाई कामगारांच्या मजुरीचा प्रश्न निकाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:19 IST2021-01-13T04:19:53+5:302021-01-13T04:19:53+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क भिवापूर : शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी सांभाळणाऱ्या सफाई कामगार महिलांनी थकीत मजुरी व मजुरीत वाढ करण्याच्या मागणीसाठी ...

सफाई कामगारांच्या मजुरीचा प्रश्न निकाली
लाेकमत न्यूज नेटवर्क
भिवापूर : शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी सांभाळणाऱ्या सफाई कामगार महिलांनी थकीत मजुरी व मजुरीत वाढ करण्याच्या मागणीसाठी साेमवारी (दि.११) आंदाेलन पुकारले. दरम्यान, दाेन तासातच संबंधित कंत्राटदाराने महिलांची व्यथा जाणून घेत त्यांच्या मजुरीचा प्रश्न निकाली काढला. यामुळे या स्वच्छतादूत महिलांना माेठा दिलासा मिळाला आहे.
स्थानिक नगर पंचायतअंतर्गत कंत्राटदार एजन्सीकडे कामाला असलेल्या ३० महिला कामगाराचे चार महिन्यापासून मजुरी थकीत आहे. शिवाय १५० रुपयाच्या ताेकड्या मजुरीत कुटुंबाचा गाडा कसा चालवायचा, असा प्रश्न उपस्थित करीत सफाई कामगार महिलांनी मजुरीचा प्रश्न साेडविण्याच्या मागणीसाठी नगर पंचायत प्रशासनाला निवेदन साेपविले हाेते. याबाबत ‘लाेकमत’ने वृत्त प्रकाशित करून समस्येकडे लक्ष वेधले हाेते.
त्यावर ताेडगा न निघाल्याने महिला कामगारांनी सेनेचे तालुकाप्रमुख संदीप निंबार्ते यांच्या नेतृत्वात साेमवारी सकाळी आंदाेलन पुकारत स्वच्छतेचा झाडू फिरणार नाही, अशी भूमिका घेतली. दरम्यान, कंत्राटदार एजन्सीच्या संबंधितांनी आंदाेलनस्थळी भेट देत कामगारांची समस्या जाणून घेतली. चार महिन्याची थकीत मजुरी तात्काळ देणार असल्याचे सांगत महिला मजुरांना २२५ रुपये मजुरी व ‘पीएफ’ सुविधा देण्याचे त्यांनी मान्य केल्यानंतर महिला कामगारांनी आंदाेलन मागे घेतले.