शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

कळमेश्वरवासीयांना प्यावे लागते दुर्गंधीयुक्त गढूळ पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 17:19 IST

नागरिकांच्या आरोग्यावर प्रश्नचिन्ह : पिण्यायोग्य असल्याचा नगरपालिकेचा दावा

आशिष सौदागर लोकमत न्यूज नेटवर्ककळमेश्वर : शहराला नगरपालिका प्रशासनाच्यावतीने नियमित पाणीपुरवठा केला जातो. मागील काही दिवसांपासून नळाला गढूळ व दुर्गंधीयुक्त पाणी येत असून, नागरिकांना तेच पिण्यासाठी वापरावे लागते. या पाण्यामुळे नागरिकांना आजार होण्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली असली तरी ते पिण्यायोग्य असल्याचा दावा नगरपालिका प्रशासनाने केला आहे.

पाणीटंचाई असल्याने कळमेश्वर ब्राह्मणी शहराला आधीच तीन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. गढूळ व दुर्गंधीयुक्त पाणी प्यायल्याने काही नागरिकांना जुलाब, पोटदुखी, ओकाऱ्या, मळमळ होणे अशी लक्षणे दिसायला लागली आहेत. लहान मुले वयोवृद्धांमध्ये याचे प्रमाण अधिक आहे. काही नागरिकांनी या पाण्याचे नमुने नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दाखविले. मात्र, अधिकाऱ्यांनी ते पाणी शुद्ध असल्याचे सांगून पिण्यायोग्य असल्याचा दावा केला आहे. काही नागरिकांनी शहरातील विविध भागातील पाण्याचे नमुने घेऊन ते नागपूर शहरातील वेगवेगळ्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले आहेत. या नमुन्यांच्या दोन चाचण्या करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

जलशुद्धीकरण संयंत्र कुचकामीशहराला शुद्ध पाणीपुरवठा व्हावा, यासाठी जलशुद्धीकरण संयंत्र बसविले आहे. त्यावर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहे. याच जलशुद्धीकरण केंद्रातून नागरिकांच्या घरांमध्ये येत असलेल्या नळाला पिवळसर व गढूळ पाणी येत आहे. या पाण्याची हलकी दुर्गंधी येत असल्याची माहिती नागरिकांनी दिली.

स्कॉडा प्रणाली विकसित

  • नगरपालिका पाणीपुरवठ्यावर दरवर्षी एकूण एकूण १४ कोटी रुपयांचा खर्च करते. शहराला इटनगोटी जलाशय, गोवरी व कळंबी येथील बोअरवेल्समधून पाणीपुरवठा केला जातो.
  • अशुद्ध पाण्याचा उपसा, जलशुद्धीकरणाचा अभाव, पाणीपुरवठा व्यवस्थापनातील चुका, पाण्याच्या टाक्यांची साफसफाई, पाणीपुरवठा विभागातील अपुरे मनुष्यबळ तसेच दुरुस्ती कामांना होणारी दिरंगाई यामुळे हा प्रकार घडत असल्याची शक्यता काही जाणकार व्यक्तींनी व्यक्त केली आहे.
  • शहराला समन्यायिक पद्धतीने पाणीपुरवठा व्हावा म्हणून स्कॉडा प्रणाली विकसित केली आहे.

"इटनगोटी जलाशयातील पाण्याची पातळी खोल गेल्याने गढूळ पाणीपुरवठा होत आहे. पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी तुरटी व ब्लिचिंग पावडरचा वापर वाढविण्यात आला आहे. पाणी शुद्धीकरणावर भर दिला जात आहे. दोन दिवसात ही समस्या निकाली निघून पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल."

- आकाश सुरडकर, मुख्याधिकारी, नगरपालिका, कळमेश्वर-ब्राम्हणी

टॅग्स :nagpurनागपूरwater pollutionजल प्रदूषणwater scarcityपाणी टंचाई