सोनेगाव तलावाचे आरक्षण बदलणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 00:23 IST2017-10-10T00:22:51+5:302017-10-10T00:23:15+5:30

नागपूर शहराच्या मंजूर विकास योजनेत सोनेगाव जलाशय म्हणून नामनिर्देशित आहे.

Reservation of Sonegaon lake reservation will change | सोनेगाव तलावाचे आरक्षण बदलणार

सोनेगाव तलावाचे आरक्षण बदलणार

ठळक मुद्देसभागृहात प्रस्ताव : तलाव सौंदर्यीकरण व पुनरुज्जीवन करणार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहराच्या मंजूर विकास योजनेत सोनेगाव जलाशय म्हणून नामनिर्देशित आहे. १५ आॅक्टोबर २००३ च्या शासन अधिसूचनेनुसार तलावाचे क्षेत्र हेरिटेज संवर्धन स्थळांच्या यादीत समाविष्ट आहे. नगर भूमापन विभागाच्या नोंदीनुसार तलावाचे क्षेत्र १६५९ हेक्टर असून, तलावाची मालकी खासगी आहे.
नगरविकास विभागाच्या निर्णयानुसार नासुप्रच्या अखत्यारितील सात योजनांचे क्षेत्र वगळून उर्वरित नागपूर शहराकरिता नागपूर महापालिकेला नियोजन प्राधिकरण म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यानुसार या तलावाचे सौंदर्यीकरण व पुनरुज्जीवन करण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. यासाठी महापालिकेला तलावाची जागा संपादित करावयाची आहे.
तलावाचे सौंदर्यीकरण व पुनरुज्जीवन करण्यासाठी कायदेशीर बाबींची पूर्तता करावयाची असल्याने, सदर आरक्षण विकास योजनेत समाविष्ट करण्यात येणार आहे. याबाबतचे फेरबदल करण्याचा प्रस्ताव सभागृहात मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. मंजुरीनंतर यावर आक्षेप व हरकती मागविण्यात येतील. त्यानंतर हा प्रस्ताव राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला जाणार आहे.
विकास योजनेतील आरक्षण बदलणार
मौजा सीताबर्डी नगर भूमापन क्रमांक १६९६ येथील १४८८.१० चौ.मी. जागा शहराच्या मंजूर सुधारित विकास योजना आराखड्यात वाणिज्य प्रयोजनासाठी आरक्षित दर्शविण्यात आलेली आहे. परंतु या जागेवर १०० वर्षांपूर्वीचे जुने बांधकाम आहे. त्यामुळे या जागेच्या आरक्षणात बदल करण्याची गरज आहे. याबाबतचा प्रस्ताव सभागृहापुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.
खुल्या जागेचे आरक्षण बदलणार
शहराच्या सुधारित मंजूर विकास आराखड्यात मौजा अंबाझरी येथील खसरा क्रमांक ६२ अंतर्गत २७०० चौ.मी. खुली जागा दर्शविण्यात आली आहे. या जागेच्या वापरात महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम १९६६ च्या कम ३७ अन्वये फेरबदल करून, या जागेचा निवासी वापरात समावेश केला जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव महापालिकेच्या सभागृहापुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.

Web Title: Reservation of Sonegaon lake reservation will change

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.