नागपूर रेल्वेस्थानकावर आरक्षण फॉर्म, पैसे निर्जंतुक करणार मशिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 11:16 PM2020-07-04T23:16:39+5:302020-07-04T23:18:44+5:30

कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. परंतु रेल्वे कर्मचाऱ्यांना थेट प्रवाशांच्या संपर्कात यावे लागते. त्यामुळे त्यांचा कोरोनापासून बचाव व्हावा यासाठी रेल्वे प्रशासनाने शक्कल लढविली आहे. आरक्षण कार्यालयात प्रवाशांनी भरलेला आरक्षणाचा फॉर्म आणि पैसे निर्जंतुक करण्यासाठी मशीनची सुविधा करून देण्यात आली आहे.

Reservation form at Nagpur railway station, money disinfection machine | नागपूर रेल्वेस्थानकावर आरक्षण फॉर्म, पैसे निर्जंतुक करणार मशिन

नागपूर रेल्वेस्थानकावर आरक्षण फॉर्म, पैसे निर्जंतुक करणार मशिन

googlenewsNext
ठळक मुद्देआरक्षण कार्यालयात सुविधा : रेल्वे कर्मचाऱ्यांचा होईल कोरोनापासून बचाव

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. परंतु रेल्वे कर्मचाऱ्यांना थेट प्रवाशांच्या संपर्कात यावे लागते. त्यामुळे त्यांचा कोरोनापासून बचाव व्हावा यासाठी रेल्वे प्रशासनाने शक्कल लढविली आहे. आरक्षण कार्यालयात प्रवाशांनी भरलेला आरक्षणाचा फॉर्म आणि पैसे निर्जंतुक करण्यासाठी मशीनची सुविधा करून देण्यात आली आहे. मशीनमध्ये आरक्षणाचा फॉर्म आणि पैसे निर्जंतुक होणार असल्यामुळे आरक्षण कार्यालयातील कर्मचाऱ्यांना कोरोनापासून बचाव करणे शक्य झाले आहे.


कोरोनामुळे रेल्वेत लॉकडाऊन करण्यात आले. परंतु रेल्वे मंत्रालयाने विशेष रेल्वेगाड्या चालविण्याची घोषणा केल्यानंतर रेल्वेचे आरक्षण कार्यालय सुरु करण्यात आले. सुरुवातीला प्रवासी आरक्षणाचा फॉर्म भरल्यानंतर पैसे आरक्षण खिडकीवरील क्लर्कला देत होते. प्रवाशाचे आणि आरक्षण खिडकीतील कर्मचाऱ्याचे बोलणे एकमेकांना ऐकू येत नसल्याने रेल्वे प्रशासनाने ‘टु वे माईक सिस्टीम’ लावली होती. परंतु एखाद्या प्रवाशाला कोरोनाची बाधा झाली असल्यास त्याने दिलेला आरक्षणाचा फॉर्म आणि पैशांमुळे आरक्षण कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाही धोका होऊ शकतो, ही. बाब हेरून रेल्वे प्रशासनाने टाकाऊ पासून टिकावू मशीन तयार केली आहे. यात जुन्या झालेल्या प्रिटरचा वापर करण्यात आला आहे. तसेच यात जुन्या नोट मोजण्याच्या मशिनमधील ‘अल्ट्राव्हायलेट लाईट’ लावण्यात आले आहे. आरक्षणाचे फॉर्म आणि पैसे यात टाकल्यानंतर ते निर्जंतुक होतात. यामुळे कोरोनापासून रेल्वे कर्मचाऱ्यांचा बचाव करण्यासाठी ही मशीन महत्वाची भूमीका बजावत आहे.

Web Title: Reservation form at Nagpur railway station, money disinfection machine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.