रोगमुक्त पशुंसाठी होणार नागपुरात संशोधन !

By Admin | Updated: June 20, 2014 01:03 IST2014-06-20T01:03:37+5:302014-06-20T01:03:59+5:30

रोगमुक्त पशु, या विषयावर संशोधन करण्यासाठी राज्यातील पहिले संशोधन केंद्र नागपूर येथे सुरू करण्यात येत आहे.

Research in Nagpur will be done for the disease free animals! | रोगमुक्त पशुंसाठी होणार नागपुरात संशोधन !

रोगमुक्त पशुंसाठी होणार नागपुरात संशोधन !

अकोला : भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर) व भारतीय वैद्यक परिषद (एमसीआय)ने रोगमुक्त पशु, या विषयावर संशोधन करण्यासाठी पाऊल उचलले असून, त्यासाठीचे राज्यातील पहिले संशोधन केंद्र नागपूर येथे सुरू करण्यात येत आहे.
मानवाला पशुंपासून होणार्‍या अनेक साथ, रोगांचे दुष्परिणाम भोगावे लागत आहेत. बर्ड फ्लू, स्वाईन फ्लू, डेंग्यू, क्षयरोग, रॅबीज, बफेलो पॉक्स (देवी) असे अनेक रोग पशुंपासून मानवाला आणि मानवापासून पशुंना होत आहेत. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ)ने या दिशेने संशोधन करण्यावर भर दिला आहे. जोपर्यंत पशु रोगमुक्त होणार नाहीत, तोपर्यंत मानव रोगमुक्त होणे अशक्यप्राय असल्याची वस्तुस्थिती विचारात घेऊन, डब्ल्यूएचओने ह्यएक पशू, एक आरोग्यह्ण हा नारा दिला आहे. या नार्‍याला अनुसरू न जगभरातील पशुवैद्यकीय संस्था, संघटना, शास्त्रज्ञ संशोधनाच्या कामाला लागले आहेत. महाराष्ट्रात नागपूर येथे यावरील संशोधनासाठी मोठे केंद्र व भव्य प्रयोगशाळा उभारण्यात येत आहे. या संशोधन केंद्राची महत्त्वाची जबाबदारी महाराष्ट्र पशु व विज्ञान विद्यापीठ (माफसू)कडेही असणार आहे.
या संशोधन केंद्रात संक्रमीत पशुंचे नमुने निदानासाठी आणले जातील. त्या नमुन्यांवर या प्रयोगशाळेत सूक्ष्म संशोधन केले जाणार आहे. या संशोधनातून जे निष्कर्ष समोर येतील, त्यानुसार पशुतील विविध साथी व रोगांवर उपाययोजना केल्या जाणार ओहत. यासाठी आयसीएआर, एमसीआय व इतर संस्थांनी पुढाकार घेतला आहे.

** स्पेटवर्म घातक
श्‍वानाच्या पोटात स्टेपवर्म असतात. ते वर्म श्‍वानाच्या शौचासोबत बाहेर येतात. श्‍वानाने शौच केलेल्या ठिकाणी गाय, शेळी, म्हशी आदी पशुंनी चारा खाल्ल्यास, ते वर्म त्यांच्या पोटात जातात आणि पोटावाटे थेट त्यांच्या मेंदूपर्यंत जातात. अशा पशुंचे मांस जर मानवाच्या खाण्यात आले, तर मानवाच्या जीवावरही बेतू शकते. अशा अनेक रोगांवर येथे संशोधन केले जाणार आहे.

Web Title: Research in Nagpur will be done for the disease free animals!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.