प्रियकराविरुद्ध बलात्काराची तक्रार  : वर्षभरापासून शरीरसंबंध, लग्नास नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 00:05 IST2019-03-24T00:04:01+5:302019-03-24T00:05:00+5:30

वयाने ११ वर्षे लहान असलेल्या प्रियकराने वर्षभर शरीरसंबंध प्रस्थापित करून लग्नास नकार दिल्याने त्याच्याविरुद्ध एका महिलेने बलात्काराची तक्रार नोंदवली.

Report of rape against boy friend: Correlation since year, negation of marriage | प्रियकराविरुद्ध बलात्काराची तक्रार  : वर्षभरापासून शरीरसंबंध, लग्नास नकार

प्रियकराविरुद्ध बलात्काराची तक्रार  : वर्षभरापासून शरीरसंबंध, लग्नास नकार

ठळक मुद्देअंबाझरीत गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वयाने ११ वर्षे लहान असलेल्या प्रियकराने वर्षभर शरीरसंबंध प्रस्थापित करून लग्नास नकार दिल्याने त्याच्याविरुद्ध एका महिलेने बलात्काराची तक्रार नोंदवली. संदीप रमेश वाघमारे (वय २४) असे आरोपीचे नाव आहे. तो अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहतो.
आरोपी संदीप आणि पीडित महिला (वय ३६) एकाच वस्तीत राहतात. त्यांच्यात दोन वर्षांपासून मैत्रीपूर्ण संबंध होते. त्याचे प्रेमसंबंधात रुपांतर झाल्यानंतर ५ जानेवारी २०१७ पासून ते एकमेकांशी शरीरसंबंध प्रस्थापित करू लागले. वर्षभरात वारंवार शरीरसंबंध जोडताना त्यांनी लग्न करण्याचाही निर्णय घेतला होता. अलीकडे मात्र तो तिला टाळू लागला. त्याचे दुसरीकडे सूत जुळल्याने तो टाळत असल्याचे लक्षात आल्याने महिलेसोबत त्याचा १७ मार्चला वाद झाला. त्याने यावेळी लग्नाला स्पष्ट नकार दिला. त्यामुळे महिलेने अंबाझरी ठाण्यात त्याच्याविरुद्ध बलात्काराची तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी संदीप वाघमारेला अटक केली.
शाळकरी मुलीसोबत लज्जास्पद वर्तन
वस्तीतील ११ वर्षीय शाळकरी मुलीसोबत लज्जास्पद वर्तन करणारा आरोपी दीपक गोकुल मिश्रा (वय २९) याच्याविरुद्ध हुडकेश्वर पोलिसांनी शुक्रवारी गुन्हा दाखल केला. पीडित मुलीने पालकांना आणि पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ती शाळेत जात-येत असताना आरोपी तिचा पाठलाग करायचा. त्याने बुधवारी सकाळी १०.३० ते ११ वाजता दरम्यान तिच्या शाळेसमोर उभे राहून अश्लील हातवारे करून तिचा पाठलाग केला. तिने विरोध केला असता त्याने तिला धमकी दिली. तिने आधी पालकांना आणि नंतर हुडकेश्वर ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी तिच्या तक्रारीवरून आरोपी दीपक मिश्राविरुद्ध विनयभंग करून धमकी देण्याचा गुन्हा दाखल केला.

Web Title: Report of rape against boy friend: Correlation since year, negation of marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.