अखेर आऊटर रिंग रोडवरील दुरुस्तीचे काम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:09 IST2021-09-23T04:09:40+5:302021-09-23T04:09:40+5:30
बुजवले जाताहेत खड्डे : अंडरपासवर लागलेले कुलूपही उघडणार लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : चार दिवसापूर्वीच रिंग रोडवरील खड्ड्यांमुळे एक ...

अखेर आऊटर रिंग रोडवरील दुरुस्तीचे काम सुरू
बुजवले जाताहेत खड्डे :
अंडरपासवर लागलेले कुलूपही उघडणार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : चार दिवसापूर्वीच रिंग रोडवरील खड्ड्यांमुळे एक ट्रक पलटला आणि एक कंटेनर चिखलात फसल्याने वाहतूक जाम झाली होती. समस्या उघडकीस आल्यानंतर नॅशनल हायवे ॲथाॅरिटी(एनएचएआय)ला अखेर जाग आली. त्यामुळे उपयोगात असलेल्या रिंग राेडच्या दुरुस्तीचे काम सुरू झाले.
जड वाहनांची वाहतूक शहराच्या बाहेरून व्हावी, यासाठी रिंग रोड उभारण्यात येत आहे. परंतु अर्धवट अवस्थेत असलेल्या या रोडच्या कामामुळे होत असलेल्या अडचणी लोकमतने सर्वप्रथम उघडकीस आणल्या. अंडरपासवर कुलूप लागले असल्याने वाहतूक जाम होत असल्याकडे लक्ष वेधले. याची गंभीर दखल घेत दोन दिवसापूर्वीच रिंग रोडवरील खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरुवात झाली. बुधवारी येथील संगमगावसह इतर प्रभावित भागात रस्ता समतल करीत रस्ते वाहतूक चालण्यायोग्य केले जात आहेत.
बाॅक्स
मुदत संपली पण रस्ता पक्का होऊ शकला नाही
आऊटर रिंग रोडचे उर्वरित राहिलेले काम करणाऱ्या कंत्राटदार कंपनीने मुदत संपल्यानंतर दोनवेळा मुदत वाढवून घेतली. परंतु तरीही पक्का रस्ता बनवू शकली नाही. पाच वर्षांनंतरही येथे वाहने चिखलात फसत आहेत. त्यामुळे सध्यातरी हा रस्ता नागरिकांसाठी अडचणीचाच ठरत आहे.
-काेट...
दोन दिवसात अंडरपासही सुरू होणार
आऊटर रिंग रोडवर आवश्यक ठिकाणी दुरुस्तीचे काम केले जात आहे. याशिवाय संगमगावजवळ असलेल्या अंडरपासवरील कुलूप उघडून ते दोन दिवसात वाहतुकीसाठी खुले केले जाईल. अंडरपासमध्ये ठेवलेले बांधकाम साहित्य दुसऱ्या ठिकाणी नेले जाईल.
समय निकाेसे, डीजीएम, पीआयओ-१