शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
2
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
3
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
4
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
5
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
6
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
7
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
8
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
9
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
10
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
11
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
12
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
13
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
14
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
15
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
16
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
17
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
18
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
19
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
20
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
Daily Top 2Weekly Top 5

फूटपाथसोबतच दुकानदारांचे अतिक्रमण काढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिकेने शहरातील फूटपाथवरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम हाती घेतली आहे. ती स्वागतार्ह आहे. पण ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महापालिकेने शहरातील फूटपाथवरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम हाती घेतली आहे. ती स्वागतार्ह आहे. पण सोबतच दुकानदारांनी रस्त्यावर व फूटपाथवर केलेले अतिक्रमण काढून रस्ते मोकळे करण्याचे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी गुरुवारी सर्वसाधारण सभेत दिले.

शहरात अनेक ठिकाणी दुकानाच्या बाहेरील परिसराचा वापर हा व्यवसायाकरिता करण्यात येतो. गर्दीच्या ठिकाणी तर चक्क दुकानासह रस्त्यावरही व्यवसाय केला जातो. यामुळे वाहतुकीच्या कोंडीसह अपघाताची शक्यता अधिक असते. अशा अतिक्रमणाची तक्रार नसली तरी मनपाने तात्काळ प्रभावाने कारवाई करावी, असे निर्देश महापौरांनी दिले.

अतिक्रमणासंदर्भात स्थगन प्रस्ताव मांडताना विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी शहरात जागोजागी अतिक्रमण असल्याचे निदर्शनास आणले. अतिक्रमणासंदर्भात तक्रारी प्रशासनाकडे केल्या, परंतु कारवाई होत नाही. गोरगरिबांवर कारवाईचा बडगा उगारला जातो. परंतु, मोठ्यांचे अतिक्रमण काढले जात नाही. मनपाचे पथकदेखील बड्या अतिक्रमणधारकांकडून पैसे घेत असल्याचा आरोप केला. नाग नदीच्या काठावरील, मोमिनपुऱ्यासह अनेक ठिकाणी कारवाईची आवश्यकता आहे. परंतु तिथे कारवाई न करता गरज नसलेल्या ठिकाणी मनपा कारवाई करीत असल्याची भूमिका त्यांनी मांडली. दरम्यान, त्यांनी नाग नदी जवळ असलेल्या एका नर्सरीचा उल्लेख केला. यासंदर्भात प्रशासनाने ही जागा नासुप्रची असल्याचे सांगितले.

...

तक्रार असो वा नसो कारवाई करा

अतिक्रमणासंदर्भात शासनाचे तसेच न्यायालयाचे आदेश आहेत. त्यानुसार जागेची मालकी कुणाचीही असो तेथील अतिक्रमण काढण्याचा अधिकार महापालिकेला आहे. त्यानुसार नर्सरीवर तात्काळ कारवाई करा, अतिक्रमणासंदर्भात महापालिकेकडे तक्रार असा वा नसो मोहीम राबवून असे सर्व अतिक्रमण काढण्याचे निर्देश महापौरांनी दिले.