शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

मूत्रपिंड व यकृताची तपासणी न करताच दिले जात आहे रेमडेसिविर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:13 IST

नागपूर : रेमडेसिविरचा वापर पूर्णपणे प्रभावी असल्याचे अद्याप सिद्ध झालेले नाही. मात्र, काही खासगी रुग्णालयांसह मनपा रुग्णालयातही सीटी स्कोअर ...

नागपूर : रेमडेसिविरचा वापर पूर्णपणे प्रभावी असल्याचे अद्याप सिद्ध झालेले नाही. मात्र, काही खासगी रुग्णालयांसह मनपा रुग्णालयातही सीटी स्कोअर ‘नॉर्मल’ असलेल्यांनाही हे इंजेक्शन दिले जात असल्याचे चित्र आहे. धक्कादायक म्हणजे, हे इंजेक्शन मूत्रपिंड व यकृतावर परिणाम करते. यामुळे रेमडेसिविर देण्यापूर्वी त्यासंदर्भातील रक्ताची चाचणी आवश्यक ठरते; परंतु चाचणी न करताच हे इंजेक्शन दिले जात असल्याचा व अतिरेक वापर होत असल्याचे प्रकार सुरूच असल्याचे दिसून येत आहे.

रेमडेसिविर या इंजेक्शनचा कोरोना संसर्गाच्या उपचारपद्धतीमध्ये वापर करताना तो मध्यम स्वरूपाची (मॉडरेट) लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी करावा, असे महत्त्वाचे निर्देश वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाने दिले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) ‘सॉलिडॅरिटी ट्रॉयल’दरम्यान ‘रेमडेसिविर’ या इंजेक्शनचे परीक्षण केले. यात हे इंजेक्शन रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी आणि संसर्गाचे दिवस कमी करण्यास प्रभावी ठरत नसल्याचे म्हटले आहे; परंतु कोरोनावर ‘अ‍ॅण्टी व्हायरल’ इंजेक्शन नसल्याने उपचाराच्या प्रायोगिक पद्धतीनुसार हे इंजेक्शन देण्यात येत आहे. या इंजेक्शनच्या वापरासंदर्भात केंद्रीय औषध नियामक मंडळ व कोविड टास्क फोर्सने दिशानिर्देश दिले आहेत. मात्र, काही रुग्णालयांमध्ये या इंजेक्शनचा वापर सौम्य लक्षणे असतानाही व किडनी व लिव्हरच्या आजारासंदर्भातील रक्ताची चाचणी न करताच दिले जात असल्याच्या रुग्णांच्या तक्रारी आहेत.

-ऑक्सिजनची पातळी घसरल्यास व न्यूमोनिया असल्यास इंजेक्शन महत्त्वाचे -डॉ. जोशी

‘एम्स’च्या औषधवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. पी.पी. जोशी म्हणाले, कोविडबाधिताच्या रक्तातील ऑक्सिजनची पातळी ९४च्या खाली घसरल्यास व त्याला न्यूमोनिया असल्यास रेमडेसिविर इंजेक्शन देणे महत्त्वाचे ठरते. सीटीस्कॅनचा स्कोअर व या इंजेक्शनच्या वापराचा फारसा काही संबंध नाही. हे इंजेक्शन ‘लाइफ सेव्हिंग’ नाही. या इंजेक्शनचा कितपत फायदा होईल, हे सांगणे कठीण आहे. कोरोनावर ‘अ‍ॅण्टी व्हायरल’ औषध नसल्याने याचा उपचारात वापर होत आहे. रेमडेसिविर हे तसे ‘सेफ’ ड्रग आहे; परंतु त्याचा प्रभाव किडनी व लिव्हरवर होत असल्याने रुग्णाला यासंदर्भातील कुठला आजार तर नाही, याची तपासणी होणे गरजेचे आहे.

-रेमडेसिविरमुळे‘अ‍ॅक्युट रिस्पेक्टरी फेल्युअर’चा धोका -डॉ. मेश्राम

मेडिकलच्या श्वसनरोग विभागाचे प्रमुख डॉ. सुशांत मेश्राम म्हणाले, रेमडेसिविरच्या सुरुवातीच्या संशोधनात असे आढळून आले की, रेमडेसिविरचे पाच इंजेक्शन घेतल्यास सुमारे १३ टक्के तर १० इंजेक्शन घेतल्यास सुमारे २६ टक्के ‘अ‍ॅक्युट रिस्पेक्टरी फेल्युअर’ होण्याचा धोका राहतो. यामुळे अनुभवी डॉक्टरांनी रुग्णाची तपासणी करूनच हे इंजेक्शन दिले पाहिजे. मूत्रपिंडाचा विकार असलेल्या रुग्णांवर या इंजेक्शनचा सांभाळून वापर करायला हवा.

रेमडेसिविर देण्यापूर्वी मूत्रपिंड व यकृताची चाचणी आवश्यक -डॉ. अशोक अरबट

वरिष्ठ श्वसनरोगतज्ज्ञ डॉ. अशोक अरबट म्हणाले, रेमडेसिविर कोरोनाच्या सर्वच रुग्णांसाठी नाही. मध्यम व गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांना डॉक्टरांनी तपासल्यावरच रेमडेसिविर देता येते. देण्यापूर्वी रुग्णांच्या मूत्रपिंड व यकृताची स्थिती पाहण्यासाठी रक्ताची चाचणी करणे आवश्यक ठरते. फॅविपिरॅव्हीर औषधी देऊनही चार ते पाच दिवस ताप कमी होत नसेल तेव्हा डॉक्टर रुग्णाची स्थिती पाहून रेमडेसिविर देण्याचा निर्णय घेऊ शकतात. या शिवाय, सीटीस्कॅनचा स्कोअर जास्त असल्यास, श्वास घेणे कठीण झाले असल्यास, कोमॉर्बिडिटी असलेल्या रुग्णांना हे इंजेक्शन दिले जाऊ शकते.