शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

राज्य निवडणूक आयुक्तांना दिलासा

By admin | Updated: November 8, 2014 02:48 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांनी आज, शुक्रवारी राज्य निवडणूक आयुक्त जे.एस. सहारिया ...

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांनी आज, शुक्रवारी राज्य निवडणूक आयुक्त जे.एस. सहारिया यांच्याविरुद्धच्या फौजदारी कारवाईवर स्थगनादेश दिला.भंडारा येथील कामगार न्यायालयाने गेल्या १६ आॅगस्ट रोजी सहारिया यांचा संबंधित प्रकरणाशी काहीच संबंध नसल्याचे म्हणणे मांडणारा अर्ज फेटाळला असून ३० आॅक्टोबर रोजी त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्याचे निर्देश दिले आहेत. या दोन्ही आदेशांना सहारिया यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. कृषी विभागात कार्यरत गणराज गभणे, ओंकार सावसाखरे व विजय मानकर यांनी सेवेत नियमित करण्यासाठी कामगार न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. याशिवाय त्यांनी कामगार न्यायालयाने दिलेल्या एका आदेशाचे पालन झाले नसल्याचा दावा करून फौजदारी अवमानना अर्ज दाखल केला. हे २००५ मधील प्रकरण असून त्यावेळी सहारिया कृषी विभागाचे सचिव होते. २००७ मध्ये त्यांची या विभागातून बदली झाली. सध्या ते राज्य निवडणूक आयुक्त आहेत. त्यांना प्रकरणात प्रतिवादी करण्यात आले नव्हते.यामुळे त्यांनी २००६ मध्ये या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचा व फौजदारी प्रकरण रद्द करण्यासंदर्भात म्हणणे मांडणारा अर्ज दाखल केला होता. हा अर्ज गेल्या आॅगस्टपर्यंत प्रलंबित होता. कामगार न्यायालयाने हा अर्ज खारीज केल्यानंतर सहारिया कामाच्या व्यस्ततेमुळे आपली बाजू स्पष्ट करू शकले नाही. परिणामी कामगार न्यायालयाने अटक वॉरंट जारी करण्याचे निर्देश दिलेत. याविरुद्ध सहारिया यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली असून त्यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. उच्च न्यायालयाने प्रतिवादींना नोटीस बजावून २८ नोव्हेंबरपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. याचिकेत तिन्ही तक्रारकर्त्यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. सहारिया यांच्यातर्फे अ‍ॅड. श्रीकांत सावजी व अ‍ॅड. विवेक सावरकर यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)